संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जयंतीनिमित्त पालखी मिरवणूक उत्साहात
schedule15 Aug 25 person by visibility 247 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंती वर्षानिमित्त राज्य शासनाच्यावतीने आज राज्यभर भव्य उत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने कोल्हापूर महापालिकेच्यावतीने सायंकाळी ५ वाजता बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी चौक ते महापालिका मुख्य इमारत या मार्गावरून श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन पालखीद्वारे मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीचा शुभारंभ उपआयुक्त परितोष कंकाळ यांच्या हस्ते करण्यात आला. या मिरवणूकीमध्ये विद्यापीठ हायस्कूल, श्री साई हायस्कूल, देशभूषण विद्यामंदिर हायस्कूल, प्रिन्सेस इंदुमती गर्ल्स हायस्कूल, न्यू हायस्कूल, मलग हायस्कूल व प्रिन्सेस पद्माराजे हायस्कूलचे सुमारे 200 विद्यार्थी व 36 शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
यावेळी वारकरी ह.भ.प. महादेव यादव महाराज, राजाराम उलपे, प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार, नगरसचिव सुनील बिद्रे, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, बाळासाहेब कांबळे, चंद्रकांत कुंभार, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, संजय शिंदे तसेच महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात पालखी मिरवणूक पार पडली.