कोल्हापूर महापालिकेच्यावतीने पाच पात्र कामगारांच्या वारसांना नियुक्तीपत्रे
schedule15 Aug 25 person by visibility 246 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : स्वातंत्र्य दिनाच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात आयोजित कार्यक्रमात अनुकंपा व लाड-पागे शिफारशीनुसार पात्र पाच कामगारांच्या वारसांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते या नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. महापालिकेच्या आस्थापनेवरून सेवानिवृत्त किंवा मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांपैकी एकाला अनुकंपा तत्वावर तर चौघांना लाड-पागे शिफारशीनुसार नियुक्तीपत्रे देण्यात आली.
या कार्यक्रमास महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपआयुक्त कपिल जगताप, परितोष कंकाळ, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, वित्त अधिकारी राजश्री पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, स्वाती दुधाणे, उज्वला शिंदे, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर रचनाकार, एन.एस.पाटील, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पवार, महादेव फुलारी, अरुण गुजर, नगरसचिव सुनिल बिद्रे, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे,
कामगार अधिकारी रामचंद्र काटकर, रवका अधिकारी प्रशांत पंडत, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, पर्यावरण अभियंता समिर व्याघ्रांबरे, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या मुख्याध्यापक राजेश धोंडगे, कर्मचारी संघाचे समुह संघटक संजय भोसले, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या विद्यार्थींनी, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.