SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सवआंतरराष्ट्रीय कौटुंबिक प्रेषण दिवस: स्थलांतरितांच्या त्यागाचा आणि योगदानाचा सन्मानगोरगरिबांना खाजगी दवाखान्याचा खर्च परवडत नाही म्हणुन ते सरकारी दवाखान्यात येतात याची जाणीव ठेवुन आरोग्य सेवा बजावा : मंत्री हसन मुश्रीफविधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी घेतला पावसाळी अधिवेशन २०२६ पूर्वतयारीचा आढावाराज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईतअनधिकृत अतिक्रमणांविरोधात सातत्याने कारवाई करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडकाळम्मावाडीतील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन

जाहिरात

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंध

schedule16 Jun 26 person by visibility 169 categoryराज्य

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या 19 व 20 जून रोजी होणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये विमानतळ परिसर तसेच संपूर्ण कोल्हापूर व इचलकरंजी शहरात दिनांक 19 व 20 जून या कालावधीत ड्रोन कॅमेरे उडविणे आणि चित्रीकरण करण्यास प्रतिबंध करण्यात आली असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे.

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्या दरम्यान ते कोल्हापूर विमानतळ, पोलीस परेड ग्राउंड व फुटबॉल मैदान, कसबा बावडा, महालक्ष्मी मंदिर, शासकीय विश्रामगृह, जनता सहकारी बँक, इचलकरंजी, कलाप्पा आवाडे टेक्सटाईल पार्क (KATP), इचलकरंजी येथे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ परिसरासह संपूर्ण कोल्हापूर व इचलकरंजी शहरात 19 व 20 जून 2026 या कालावधीत ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास बंदी राहणार आहे.

  या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes