SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

अहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधव

schedule16 Jun 26 person by visibility 277 categoryराज्य

कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जाज्ज्वल्य कार्यकर्तृत्वाबरोबरच त्यासाठी त्यांनी सोसलेल्या संघर्षाची गाथाही समाजासमोर यायला हवी, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी व्यक्त केली.

विद्यापीठात आज प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्या हस्ते रामभाऊ लांडे लिखित ‘लाइफ अँन्ड वर्क ऑफ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ या इंग्रजी चरित्र पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. मल्हार सेनेचे बबनराव रानगे प्रमुख उपस्थित होते.

प्र-कुलगुरू डॉ. जाधव म्हणाल्या, अहिल्यादेवी होळकर यांनी वडिल आणि सासरे यांच्या कणखर पाठिंब्याने आपल्या कार्याची सुरवात केली असली तरी एक महिला म्हणून त्यांना अनेक अडचणींतून जावे लागले. अनेक समस्यांवर मात करीत त्यांनी आपली वाटचाल केली आणि त्यातून उत्तुंग कार्याची उभारणी केली. ते कार्य महत्त्वाचे आहेच, मात्र त्यामागील संघर्ष आणि त्यागही जनतेसमोर यायला हवा. त्या दृष्टीने अभ्यासक आणि संशोधकांनी संदर्भांचा धांडोळा घेतला पाहिजे. अहिल्यादेवींचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आधुनिक माध्यमांचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी पुस्तकावर भाष्य केले. ते म्हणाले, रामभाऊ लांडे हे केवळ लेखक नाहीत, तर होळकरशाहीचे संशोधक आहेत. त्यामुळे त्यांच्या हातून अहिल्यादेवींविषयीचे पुस्तक इंग्रजीतून साकार होणे, महत्त्वाचे आहे. उपलब्ध सर्व साधनांचा आधार घेऊन त्यांनी अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचे विविध पैलू उलगडले आहेत. धार्मिकतेच्या पलिकडेही अत्यंत वेगळ्या लोककल्याणकारी भूमिकेतून अहिल्यादेवींनी कार्य केले. त्यांनी केलेला दानधर्म हा त्यांनी राज्याच्या दौलतीमधून नव्हे, तर त्यांच्या खासगी निधीमधून केला, हा फार महत्त्वाचा संदर्भ या पुस्तकातून सामोरा आला आहे. तो अमूल्य स्वरुपाचा आहे. यावरुन एक राज्यकर्ता म्हणून त्यांचे मोठेपण अधोरेखित होते.

यावेळी लेखक  लांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासनाचे समन्वयक डॉ. मच्छिंद्र गोफणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. दत्तात्रय घुटुगडे यांनी आभार मानले.

 कार्यक्रमाला तेजस प्रकाशनचे रावसाहेब पुजारी, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. प्रभंजन माने, डॉ. दत्तात्रय मचाले, अशोक परीट, डॉ. चांगदेव बंडगर, नारायण मोटे-देसाई, प्रताप चिपळूणकर, यश आंबोळे, अजय गोदे, अजय पुजारी, वैभव जानकर, संतोष कोळेकर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes