+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustभाजपाच्यावतीने विजय संकल्प मोटर रॅली उत्साहात adjustशक्तिपीठ महामार्ग रद्द करावा मागणीसाठी शक्तिपीठ महामार्ग बाधित बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सोमवार 21 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात राज्यव्यापी निर्धार परिषद adjustआपट्याचे पान : वैज्ञानिक महत्व adjustराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकीची हत्या adjustकोल्हापूरचा ऐतिहासिक, गौरवशाली परंपरा असलेला दसरा सोहळा दिमाखात साजरा; श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन adjustकेंद्र शासन पुरस्कृत पीएम ई-बस सेवा प्रकल्पांतर्गत विविध पायाभूत सुविधा उभारणी कामकांजाचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते प्रारंभ adjustजिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते जुना राजवाडा कमानीस तांब्याच्या कलशाचे मंगलतोरण; हीलरायडर्स तर्फे कार्यक्रमाचे आयोजन, ३९ वे मंगल तोरण बांधण्यात आले adjustशाहूवाडी तालुक्यात धडक कारवाई : गोवा बनावटीची दारुच्या मालाची बेकायदेशीर वाहतूक करणारे ट्रकमालासह ३८ लाखाचा मुद्देमाल जप्त adjustसर्व महाविद्यालये, अधिविभागांत एकाच वेळी साजरा होणार वाचन प्रेरणा दिन; शिवाजी विद्यापीठाचे नियोजन adjust‘केआयटी’च्या सीडीसी कमिटीवर मोहन घाटगे, चंद्रशेखर डोल्ली; सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी स्विकारला पदभार
1001146600
schedule04 Jul 23 person by visibility 1986 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून सोशल मीडियाव्दारे आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यामुळे काही घटनामध्ये परिस्थिती चिघळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून दोन गटामध्ये तेढ निर्माण झाला होता. त्यानुसार पोलीस ठाणे अंतर्गत दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) नुसार अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी 5 जुलै रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 19 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश अंमलता राहील.

आदेशामध्ये कलम 37 (1) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदूका, सुऱ्या, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. दगड किंवा इतर शस्त्रात्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन. जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे. ज्यामुळे सभ्यता अथवा नितिमत्ता यास धक्का पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा जनतेत प्रसार करणे.

 कलम 37 (3)- जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमणेस, मिरवणुका काढणे व सभा घेणे.

 हा हुकुम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तत्ये व अधिकार बजाविणे संदर्भात उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधिक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पेालीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा शांततामय मार्गाने साजरे करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादींना लागू पडणार नाही.