SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना; RRR तंत्रज्ञानाद्वारे पुनरुज्जीवनाचा प्रस्तावडी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘युरेका 2026’ आयडिया पिचिंग स्पर्धा संपन्न कोल्हापूर शहराच्या आरोग्य सुविधांना मिळणार नवी दिशा: महानगरपालिका आरोग्य समितीच्या पहिल्याच बैठकीत महत्त्वाचे निर्णयवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या मनगटावर लाडक्या भगिनींच्या प्रेमाची राखी; "माता-भगिनींचे आशीर्वाद हेच माझे खरे सुरक्षा कवच" - हसन मुश्रीफपहिल्या महायुद्धादरम्यान इटली आणि जर्मनीचा संघर्षभागीरथी संस्थेच्या महिला भगीनींनी बांधला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना रक्षाबंधनाचा पवित्र धागागोकुळ निवडणुकीत शेतकरी पॅनेलची मोर्चेबांधणी; २५ जागा स्वबळावर लढवण्याची भूमिका : आमदार सतेज पाटीलप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलची राष्ट्रभक्तीपर समूहगान स्पर्धेत हॅटट्रिक!कोल्हापूर : छत्रपती शिवाजी मार्केट इमारतीच्या बाल्कनीचा गिलावा पडला ; सुरक्षिततेसाठी सेफ्टीनेट लावणारकोल्हापूर महापालिकेच्यावतीने निवासी अतिक्रमण नियमितीकरणासाठी कालबध कार्यक्रम निश्चित

जाहिरात

 

रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना; RRR तंत्रज्ञानाद्वारे पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव

schedule28 Aug 26 person by visibility 109 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : ऐतिहासिक आणि कोल्हापूरच्या मध्यवर्ती स्थानी असलेला रंकाळा तलाव वाचवण्यासाठी महापालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सन १८३३ मध्ये निर्मित आणि ६ किलोमीटर परिघ लांबीच्या या तलावाचे पर्यावरणीय संवर्धन करण्यासाठी ‘RRR’ (Resurrection, Restoration & Rejuvenation) या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 

सुमारे १०७ हेक्टर क्षेत्रफळ, ४.५ मीटर सरासरी खोली आणि ४७ लाख घनमीटर पाणीसाठवण क्षमता असलेल्या या तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारणे, प्रदूषण नियंत्रण आणि नैसर्गिक परिसंस्थेचे जतन करण्याचे उद्दिष्ट ठेवून या पर्यावरणपूरक उपाययोजना राबविल्या जाणार आहेत.
​यासाठी ‘COWNOMICS’ या पेटंट तंत्रज्ञानाचा वापर करून एक वर्षाच्या कालावधीत स्थानिक परिसंस्थेचे पुनरुत्थान, पुनर्स्थापना व पुनरुज्जीवन केले जाणार आहे. या प्रक्रियेची सुरुवात तलावाचा सविस्तर अभ्यास व स्थळ पाहणी करून केली जाईल, त्यानंतर स्थानिक कृषी-हवामान क्षेत्रातील निवडक वनस्पतींच्या समूहापासून १०० टक्के वनस्पतीजन्य अर्क तयार केला जाईल. हा द्रवरूप संकेंद्रित अर्क ताज्या पिण्यायोग्य पाण्यात विरळ करून सूर्योदयाच्या वेळी तलावाच्या पाण्यात सोडला जाईल, जेणेकरून सूर्यप्रकाशात हे द्रावण जल-परिसंस्थेमध्ये कार्यान्वित होऊन नैसर्गिक प्रक्रियांना चालना देईल. 

या संपूर्ण प्रक्रियेचे तीन मुख्य टप्पे ठरवण्यात आले असून, पहिल्या ६ महिन्यांच्या पुनरुज्जीवन टप्प्यात दररोज येणाऱ्या प्रदूषणाच्या भारानुसार जलस्रोताची क्षमता समायोजित करण्यावर भर दिला जाईल. त्यानंतरच्या ३ महिन्यांच्या पुनर्स्थापना टप्प्यात तळाशी साचलेला गाळ नष्ट करून पाण्याची साठवणूक क्षमता पुनर्स्थापित केली जाईल, तर शेवटच्या ३ महिन्यांच्या पुनरुत्थान टप्प्यात स्थानिक सूक्ष्मजीवांचे पुनरुज्जीवन केले जाईल.

​या जैविक उपचार पद्धतीमुळे दुर्गंधी व डासांची संख्या कमी होऊन टीडीएस (TDS), टीएसएस (TSS) आणि सीओडी (COD) मध्ये सुधारणा दिसून येणार आहे. जलस्रोतामध्ये थेट रासायनिक किंवा भौतिक हस्तक्षेप न करता जैविक पद्धतीने प्रदूषणाचे व्यवस्थापन करणारी ही एक शाश्वत पद्धत असल्याचे दस्तऐवजात म्हटले आहे. या संपूर्ण वर्षभरात तलावातील पाणी, गाळ आणि हवेच्या गुणवत्तेचे नियमित परीक्षण करून उपचार प्रक्रियेचा आढावा घेतला जाणार आहे. रंकाळा तलावाचे जलसंवर्धन, नागरिकांची सुरक्षितता आणि स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण या तिन्ही बाबींचा समतोल साधत तलावाचा दीर्घकालीन पर्यावरणपूरक विकास करण्याचा महापालिकेचा मानस आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes