कॉपीमुक्त अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात जनजागृती सप्ताह
schedule16 Jan 26 person by visibility 53 categoryराज्य
कोल्हापूर : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा फेब्रु.-मार्च 2026 कॉपीमुक्त अभियानांतर्गत सोमवार, 19 ते 26 जानेवारी या कालावधीत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी दिली आहे.
याकरिता 19 जानेवारीपासून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अखेरच्या दिवशी म्हणजे सोमवार, 26 जानेवारी रोजी ग्रामसभा बैठकीमध्ये मुख्याध्यापक/शिक्षक यांनी कॉपीमुक्त अभियानासंदर्भात वरील विषयांबाबत माहिती देणे व याबाबत जनजागृती करणे व कॉपीमुक्त वातावरणारा परीक्षा पार पाडण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन करणे.
विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ यांनी शपथ घ्यावयाची आहे, याप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती कार्यालयाने परिपत्रकाव्दारे दिली.