SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संभाजीपूर येथील शिबिरात २७७ जणांची तपासणीसाखर कारखान्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर व चारा व्यवस्थापनावर भर द्यावा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडसेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यात बाल आरोग्य तपासणीला वेगनवरात्र महोत्सवाला कोल्हापूरवासियांनी भरभरून प्रतिसाद द्यावा : जिल्हाधिकारी डॉ राठोडकेर्ले येथील अंगणवाडीतून पौष्टिक आहाराबाबत जनजागृतीकिशोर घाटगे यांना नवी दिल्लीत 'इंटरनॅशनल शांतिदूत समाजरत्न' पुरस्कार प्रदान!जागतिक टपाल दिन: संवाद आणि संस्कृतीचा विश्वासाचा धागाप्रार्थना संगीत ही जीवन उन्नतीची दिशा: कैशवचैतन्य कुंटेविनापरवाना व्यवसायांवर महापालिकेची कारवाई; ५१ व्यवसायधारकांना नोटिसा; ३ लाख १० हजारांची थकबाकी वसूलगोकुळ दूध संघ निवडणूक: महायुतीच्या 'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी'चे पॅनेल जाहीर; दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत घडामोडींना वेग

जाहिरात

 

केर्ले येथील अंगणवाडीतून पौष्टिक आहाराबाबत जनजागृती

schedule09 Oct 26 person by visibility 196 categoryराज्य

◼️‘पोषण तराजू’ उपक्रमातून मुलांना संतुलित आहाराचे महत्त्व

कोल्हापूर : राष्ट्रीय पोषण माह २०२६ निमित्त केर्ले येथील अंगणवाडी क्रमांक २०३ मध्ये मुलांसाठी पौष्टिक आहाराबाबत जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून जंक फूडचे दुष्परिणाम समजावून सांगतानाच सकस व संतुलित आहाराचे महत्त्व प्रात्यक्षिकाद्वारे पटवून देण्यात आले.

‘पोषण तराजू’ या उपक्रमांतर्गत कुरकुरे यांसारखे जंक फूड आणि पौष्टिक फळे यांची तुलना करण्यात आली. जंक फूडमधून शरीराला आवश्यक पोषक घटक पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत, तर फळांमधून जीवनसत्त्वे, खनिजे व इतर आवश्यक पोषक घटक मिळतात, हे मुलांना समजावून सांगण्यात आले. तसेच जंक फूडच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम आणि पोटातील कृमींसारख्या आरोग्यविषयक समस्यांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

मुलांनी जंक फूडचे सेवन टाळून आहारात फळे व इतर पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा आणि निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहाराच्या सवयी जोपासाव्यात, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes