SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रार्थना संगीत ही जीवन उन्नतीची दिशा: कैशवचैतन्य कुंटेविनापरवाना व्यवसायांवर महापालिकेची कारवाई; ५१ व्यवसायधारकांना नोटिसा; ३ लाख १० हजारांची थकबाकी वसूलगोकुळ दूध संघ निवडणूक: महायुतीच्या 'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी'चे पॅनेल जाहीर; दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत घडामोडींना वेगगोकुळ दूध संघ निवडणुकीत 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी'च्या पॅनलची घोषणा दणदणीत जाहीरनामा जाहीर; दूध उत्पादकांसाठी सवलतींचा वर्षाव!सायबर जनजागृती महिन्यानिमित्त कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने डिजिटल सायबर चित्ररथाचे उ‌द्घाटनग्रामीण भागातील अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी नागरिकांचा प्रतिसादहेरवाड, शिरदवाड आरोग्य उपकेंद्रांना राष्ट्रीय NQAS मानांकननटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; अभिनय, संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा काळाच्या पडद्याआडज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन; चित्रपटसृष्टीत शोककळाभारतीय हवाई दल दिन: शौर्य, पराक्रम आणि देशसेवेचे प्रतीक

जाहिरात

 

विनापरवाना व्यवसायांवर महापालिकेची कारवाई; ५१ व्यवसायधारकांना नोटिसा; ३ लाख १० हजारांची थकबाकी वसूल

schedule08 Oct 26 person by visibility 136 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा अधिकृत व्यवसाय परवाना न घेता व्यवसाय करणाऱ्या तसेच परवाना मिळविण्यासाठी आवश्यक अर्ज दाखल न केलेल्या व्यवसायधारकांवर महापालिकेच्या परवाना विभाग, घरफाळा विभाग, विभागीय कार्यालय क्र. ४ (ताराराणी मार्केट) आणि उपद्रव शोध पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली.

महालक्ष्मी चेंबर, स्टेशन रोड तसेच विचारे कॉम्प्लेक्स परिसरातील १०८ मिळकतींच्या सर्वेक्षणादरम्यान ५१ विनापरवाना व्यवसायधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच भाडेकरार सादर न करणाऱ्या २७ संबंधितांनाही नोटिसा देण्यात आल्या. या कारवाईदरम्यान महापालिका करांची थकबाकी असलेल्या व्यवसायधारकांकडून एकूण ३ लाख १० हजार रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली.

महापालिका क्षेत्रातील व्यवसायांची तपासणी करून व्यवसाय परवाना, घरफाळा तसेच अन्य महापालिका करांची पूर्तता झाली आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्याची कार्यवाही सुरू आहे. विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या तसेच महापालिका करांची थकबाकी असलेल्या व्यवसायधारकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.

ही कारवाई आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या नियंत्रणाखाली तसेच सहाय्यक आयुक्त डॉ. विजय पाटील आणि कर निर्धारक सुधाकर चलावड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईमध्ये परवाना अधीक्षक अशोक यादव, कर अधीक्षक अर्चना प्रभावळे, शिवाजी कोकरे यांच्यासह घरफाळा, परवाना, उपद्रव शोध पथक व विभागीय कार्यालय क्र. ४ मधील कर्मचारी सहभागी झाले होते.

महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवसायधारकांनी नियमानुसार व्यवसाय परवाना घेऊनच व्यवसाय करावा तसेच घरफाळा व इतर महापालिका करांची थकबाकी वेळेत भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes