कोल्हापूर : तहसिलदारांकडून प्रलंबित कामे करून देण्यासाठी पाच लाखाची घेतली लाच; पंटरला अटक, शाहूवाडी तालुक्यात खळबळ
schedule19 Mar 25 person by visibility 1351 categoryगुन्हे

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील भैरेवाडी येथील सुरेश जगन्नाथ खोत यांने तहसिलदार यांचेकडून प्रलंबित कामे करून देतो असे सांगून पाच लाख रूपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खोत याला अटक केली. लाचलुचपतच्या या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार यांचे मामे भाऊ व त्यांचे सह हिस्सेदार यांनी मौजे सावे येथे जमीन खरेदी केली असुन सदर जमीनीचे गट नंबरचे फेरफार मध्ये खाडाखोड करून त्यामध्ये चुकीचे गट नंबर नोंद केलेले आहेत. तरी सदर फेरफार मध्ये खाडाखोड करणा-यां विरूध्द योग्य ती कारवाई करून पुर्ववत सातबारा व फेरफार दुरूस्ती करून मिळावा म्हणून तक्रारदार यांचे मामेभाऊ यांचेसह त्यांचे सह हिस्सेदार यांनी तहसिलदार कार्यालय शाहुवाडी येथे अर्ज दिला होता. सदर दिले अर्जाचे कामाचा पाठपुरावा तक्रारदार हे पाहत होतो. या अर्जामध्ये शाहुवाडी तहसिलदार यांचेसमोर सुनावणी चालु होती, त्या अर्जाची सध्यस्थिती काय आहे हे विचारणा करणेसाठी तक्रारदार हे तहसिलदार ऑफीस शाहुवाडी येथे गेले होते त्यावेळी तेथे तक्रारदार यांना सुरेश खोत हे भेटले व त्याने तक्रारदार यांना त्यांचा मामेभाऊ यांचे गौजे सावे येथील प्रलबिंत काम तहसिलदार शाहुवाडी यांचेकडुन पुर्ण करून देतो त्याकरीता तहसिलदार यांना देणेसाठी तक्रारदार यांचेकडे ५,००,०००/- रूपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तकारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तकार दिलेली होती.
तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे दिलेल्या तकार अर्जाप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणीमध्ये सुरेश खोत याने तकारदार यांचे मामेभाऊ यांचे मौजे सावे येथील प्रलबिंत काम तहसिलदार शाहुवाडी यांचेकडुन पुर्ण करून देतो त्याकरीता तहसिलदार यांना देणेसाठी तक्रारदार यांचेकडे ५,००,०००/- रूपये लाचेची मागणी केलेचे निष्पन्न झाले.
सापळा कारवाई आयोजीत केली असता पंच साक्षीदारांचे समक्ष सुरेश खोत यांनी तक्रारदार यांचेकडुन मागणी केलेप्रमाणे ५,००,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारलेने त्यांना पकडणेत आले.
सदरबाबत आरोपी सुरेश जगन्नाथ खोत, वय ४९ वर्षे, रा.भैरेवाडी, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर यांचेविरूध्द शाहुवाडी पोलीस ठाणे, जि. कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्पान ब्युरो, पुणे. डॉ. शितल जान्हवे खराडे, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे, श्री. विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे यांचे मार्गदर्शनानुसार वैष्णवी पाटील, पोलीस उप अधीक्षक, स.पो. फौ. प्रकाश भंडारे, पो.हे.कॉ. विकास माने, पो.हे.कॉ. संदिप काशीद, पो.ना. सुधिर पाटील, पो.कॉ. उदय पाटील, चा.पो.कॉ. प्रशांत दावणे ला.प्र.वि.कोल्हापूर अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी केली आहे.