SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : प्रभाग १८ मधून युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव निवडणूक रिंगणात....यशवंत विद्यालयमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात निवडणुक कामगीरीसाठी गैर हजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर फौजदारी कारवाईशिवाजी विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ बुधवारी प्रख्यात संशोधक डॉ. जी. सतीश रेड्डी प्रमुख पाहुणेमतमोजणीत पारदर्शकता आणि अचूकता ठेवा : जिल्हाधिकारी अमोल येडगेजानेवारीत विद्यापीठात स्पार्क फिल्म फेस्टिव्हलइतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहनडिजिटल युग हे जीवनाचा अविभाज्य भाग : डॉ. सागर डेळेकरपरिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल ॲप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहनप्राचीन ज्ञान-परंपरेची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत भारताला ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

यशवंत विद्यालयमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात

schedule20 Dec 25 person by visibility 105 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : गजानन महाराज नगर येथील यशवंत विद्यालय मध्ये शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी शाळेमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात पार पडली शाळेतील प्रत्येक इयत्तेतील चार विद्यार्थी सरप्राईज टेस्ट घेऊन निवडले होते.

स्पर्धेमध्ये चार गट तयार केले होते. त्या गटांना निशिगंधा, चाफा, जुई व मोगरा अशी नावे दिली होती स्पर्धेमध्ये एकूण तीन फेऱ्या होत्या तर चौथी फेरी ही बजर फेरी होती.

अखेर चाफा गटाने 21 गुणांसह अव्वल स्थान पटकावले तर निशिगंध गट 11 गुणांसह दुसऱ्या स्थानावरती राहिला विजेत्या गटातील सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. स्पर्धेचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संतोष पाटील  यांनी केले तर गुणलेखन  वंदना कांबळे यांनी केले पंच म्हणून जयश्री चौगले यांनी काम पाहिले. 

 यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तृप्ती चांदेकर  व साक्षी  सरनाईक  यांचे सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes