SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विभागीय माहिती कार्यालय - संविधान दिन साजराग्रंथालयांच्या भवितव्याविषयी विद्यापीठात चर्चासत्र यशस्वीडांबरी प्लांट सुरू करण्याच्या हालचालींना वेग; अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता यानी प्रकल्पाची केली संयुक्त पाहणीकोल्हापूर भाजपकडून संविधान दिन उत्साहात; राष्ट्रनिर्माणात संविधानाचे महत्व अधोरेखितसमाजातील शेवटच्या घटकाचं हक्क आणि अधिकार अबाधित राखण्याचं काम संविधानाने केले : शीतल धनवडे कोल्हापूर : मतदारांना नाव शोधण्यासाठी मतदार सहाय्यता केंद्र सुरू‘गोकुळ’मध्ये राष्ट्रीय दुग्ध दिन साजरा; डॉ. कुरियन यांना अभिवादनशिवाजी विद्यापीठात संविधान दिन व शहीद दिनवुलू कंपनीच्या सहकार्यातून राज्यभरात पर्यटनस्थळी शौचालयं उभारण्याचा युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा संकल्पडीकेटीई येथे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे (सरकार) जयंतीनिमित्त अभिवादन

जाहिरात

 

आरपीएल २०२५ क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात

schedule19 Apr 25 person by visibility 641 categoryक्रीडा

कोल्हापूर  : रोटरी क्लब  ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्या वतीने आयोजित रोटरी प्रीमियर लीग - आरपीएल २०२५  स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. रणजी खेळाडू उमेश गोटखिंडीकर आणि संग्राम अतीतकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.  मेरी वेदर मैदानावर दिवस रात्र होणाऱ्या या स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले आहेत. 

उद्घाटन समारंभ दरम्यान रोटरी चे माजी प्रांतपाल उद्योजक संग्राम पाटील तसेच टी.आर.पाटील, व्यंकटेश बडे, संजय कदम, सचिन परांजपे, निलेश पाटील, डॉ. विलास नाईक, डॉ. संदीप पाटील, अभिजित पाटील  यांच्यासह क्लबचे अध्यक्ष संजय भगत, इव्हेंट चेअरमन रवी मायदेव,  सेक्रेटरी रवी खोत, इव्हेंट को - चेअरमन डॉ.महादेव नरके, रविराज शिंदे, सचिन गाडगीळ,  अभिजीत भोसले ,दाजीबा पाटील , संदीप साळोखे यांच्यासह रोटेरियन आदी उपस्थित होते. 

यावर्षी या स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले असून यामध्ये एमडब्ल्यूजी सुपर किंग्स , माई हुंडाई सिद्धिविनायक , कोहिनूर कीर्ती चॅलेंजर्स ,  बडेज लकी लेजंडस , लॉंग लाईफ मोती महल आणि हॉटेल किनारा स्पोर्ट्स या संघांचा समावेश आहे. या संघाच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली, बेळगाव, हुबळी, रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील ७८ खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत. 

आज झालेल्या  पहिल्या सामन्यात  हॉटेल किनारा स्पोर्ट्स ने कोहिनूर कीर्ती संघावर आठ धावांची विजय मिळवला. सामनावीर सचिन हेगडे ठरला. एम डब्ल्यू जी सुपर किंग्ज संघाने  माई हुंडाई सिद्धिविनायक संघावर चार गाडी राखून विजय मिळविला. विशाल कल्याणकर सामनावीर ठरला. 
लॉंग लाईफ मोती महल संघाने  कोहिनूर कीर्ती चॅलेंजर संघावर   २३ धावांची विजय मिळवला. सचिन गाडगीळ हे सामनावीर ठरला. एमडब्ल्यूजी सुपर किंग्स संघाने बडेज लकी लेजंडस संघावर विजय मिळवला. नामदेव गुरव सामनावीर ठरला.

उद्या या स्पर्धेतील दोन उपांत्य आणि  अंतिम सामना खेळवला जाणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes