SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महायुतीच्या ऐतिहासिक विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल; पालकमंत्री प्रकाश आबिटकर व माजी आमदार के. पी. पाटील यांचा विश्वासआंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिन: एक महत्त्वपूर्ण जागतिक मोहीमकोल्हापूर जिल्ह्यात 26 ऑक्टोबरपर्यंत बंदी आदेश लागूपोलीस स्मृती दिनी पोलीस हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून वाहणार श्रद्धांजलीशिवसेना नगरसेवक आक्रमक; विविध मागण्यांसाठी आयुक्तांना निवेदन!सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन आदर्श डॉक्टर बना : डॉ. संजय डी. पाटीलसीपीआरमध्ये कवटीच्या तळाशी संबंधित अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पहिल्यांदाच यशस्वीधरणगुत्तीत आरोग्य शिबिरात ५३० नागरिकांची तपासणीसेवा संकल्प अभियानांतर्गत १६ हजार ६८३ दाखल्यांचे वितरणकोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव : १३ ऑक्टोबर रोजी पर्यटक व नागरिकांना 'कोल्हापूर चित्रनगरीची विनामूल्य सफर'

जाहिरात

 

महायुतीच्या ऐतिहासिक विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल; पालकमंत्री प्रकाश आबिटकर व माजी आमदार के. पी. पाटील यांचा विश्वास

schedule13 Oct 26 person by visibility 158 categoryउद्योग

◼️महायुतीच्या प्रचारार्थ अर्जुनवाडा येथे राधानगरी व भुदरगडमधील ठराव धारकांच्या मेळाव्याला जोरदार प्रतिसाद
           
अर्जुनवाडा : महायुतीच्या ऐतिहासिक विजयात राधानगरी- भुदरगड तालुक्यांचा सिंहाचा वाटा असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आबिटकर व माजी आमदार के. पी. पाटील यांनी व्यक्त केला.
             
महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अर्जुनवाडा ता. राधानगरी येथे राधानगरी व भुदरगड तालुक्यातील ठराव धारकांच्या मेळाव्याला जोरदार प्रतिसाद मिळाला.
         
पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, सत्तेच्या पाठबळाशिवाय सहकाराच्या विकासाला गती मिळत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळच्या विकासाचा महायुतीचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. मागील सहा महिन्यांपासून गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने राधानगरी तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. महायुतीची भूमिका आणि विरोधकांची भूमिका जनतेसमोर आहे. महायुतीच्या पॅनेलला सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. गोकुळच्या मागील निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मताधिक्यात राधानगरी तालुक्याचा सिंहाचा वाटा होता. यंदाच्या निवडणुकीतही राधानगरी-भुदरगड तालुका महायुतीच्या विजयात सिंहाचा वाटा उचलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
              
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, मागील पाच वर्षांत गोकुळ दूध संघाने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. संघाने २० लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट गाठले असून, मागीलवेळी दिलेल्या आश्वासनानुसार दूध दरवाढही केली आहे. गोकुळ हा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात उत्कृष्ट ठरला आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना मतदान करून प्रचंड मताधिक्याने विजयी करणे आवश्यक आहे. मतदान करताना मतपत्रिकेवरील नाव आणि गाव वाचत बसण्यापेक्षा कापबशी हे चिन्ह दिसताच शिक्का मारावा, असे आवाहन त्यांनी केले. महायुतीचा विजय निश्चित असला, तरी विरोधी आघाडीकडून विविध आमिषे दाखवली जात आहेत. ठरावधारकांनी या आमिषांना बळी पडू नये. गोकुळ दूध संघ हा सामान्य आणि कष्टकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा कणा आहे. राधानगरी-भुदरगड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ठरावधारक महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वासही के. पी. पाटील यांनी व्यक्त केला.
                
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, विरोधक वेगवेगळ्या कथा सांगून मतदारांचा मनभेद करण्याचे काम  करीत आहे. गेल्या निवडणुकीत राधानगरी भुदरगड तालुक्याने मताधिक्याचा उच्चांक केला होता. या निवडणुकीतही तो उच्चांक अबाधित राहील याची मला खात्री आहे. गोकुळ दूध संघाची ही निवडणूक आता शेवटच्या टप्प्याकडे निघालेली आहे. घटस्थापना होऊन पवित्र असा दसरा सणही सुरू झालेला आहे. या पार्श्वभूमीवर ठरावधारक सभासदांना नवदुर्गासह विविध देव-देवतांचे दर्शन घडवण्याची ही सुवर्णसंधी आहे. सर्वच नेतेमंडळींनी मतदार बंधू-भगिनींना देवदर्शनाला घेऊन जाऊन 
पवित्र अशा नवरात्रीच्या उत्सवामध्ये लवकरात लवकर देवदर्शन घडवून भाग्य मिळवावे.         
                    
यावेळी खासदार धनंजय महाडिक,  माजी आमदार संजयबाबा घाटगे, गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, केडीसीसी बँकेचे संचालक ए.वाय. पाटील, धैर्यशील पाटील- कौलवकर यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes