शालेय पोषण आहार, कामगारांच्या विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांनी घेतली गंभीर दखल..!
schedule18 Jan 23 person by visibility 398 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटना (सी आय टी यु) चे शिष्टमंडळ आज कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शालेय पोषण आहार लेखाधिकारी दिपक माने व जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना भेटून शालेय पोषण आहार कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्याशी प्रामुख्याने स्वयपाकी तथा मदतनीसाना इतर राज्यांच्या तुलनेत मिळणारे तुटपुंजे मानधन व त्याच्या मोबदल्यात करावी लागणारी कामे. स्वंयपाकी यांना इंधन भाजीपाला बीले वेळेवर न मिळणे. शालेय पोषण आहाराचा मेन उद्देशाला अनुसरून अंमलबजावणी होत नसल्याने मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. गेली सहा महिने एकाच प्रकारच्या कडधान्याचा पुरवठा, पुरवठादाराकडून येणारे निकृष्ट दर्जाचे धान्य उदाहरणार्थ किडका व पोकळ न भिजणारा व न शिजणारा वाटाणा, काळपट कलरचे तिखट,बडीशेप मिश्रीत जीरे इत्यादी .धान्य व धान्यादी मालाचा पुरवठा वेळेत न होण व त्यामुळे ठेकेदारास करावी लागणारी कसरत अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
ही बाब गंभीर असल्याचे संघटनेने जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले. व ही बाब गंभीर आहे हे त्यानी मान्य केले व त्याची तातडीने दखल घेतली जाईल असे. शिष्टमंडळास सांगितले .
शिष्टमंडळात शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशन (सी आय टी यु)चे राज्याध्यक्ष कॉम्रेड प्राचार्य ए बी पाटील, जिल्हा जनरल सेक्रेटरी निवेदिता वासमकर, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी कुंभार खजिनदार संतोष देसाई, राज्य कमिटी सदस्य संभाजी पाटील, सदस्य सुनिता मलिकवाडे, संतोष मोहिते, विजय गणाचारी, राजू सुतार आदी उपस्थित होते.