मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली देशाचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांची सदिच्छा भेट
schedule24 May 25 person by visibility 194 categoryराज्य

नवी दिल्ली : देशाचे नूतन सरन्यायाधीश न्या. भूषण रामकृष्ण गवई यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सदिच्छा भेट घेतली. या भेटीत फडणवीस यांनी सरन्यायाधीश गवई यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राला पुन्हा एकदा सरन्यायाधीशपदाचा मान मिळाल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. या भेटीदरम्यान, श्री फडणवीस यांनी न्या. गवई यांना महाराष्ट्र विधानमंडळात सर्वपक्षीय सत्कार समारंभासाठी
तसेच भारतीय संविधान या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्यान देण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले.