SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहीमेत कोल्हापूर विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालय राज्यात तृतीय क्रमांकावरशिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) 2025 परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्धकुरुंदवाड आगारात पाच नवीन बसेस दाखल‘विकसित भारत-2047’ लक्ष्य साधण्यासाठी महाराष्ट्र ‘विकास आणि विरासतचे व्हीजन’ घेऊन सज्ज : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली देशाचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांची सदिच्छा भेटमान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार; अनुकूल परिस्थितीआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटीलमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करण्याऐवजी मूळ विषयावर बोलावे : आमदार सतेज पाटीलभारतीय सैन्यदलाप्रति कृतज्ञता आणि सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी कोल्हापुरात काँग्रेसच्या वतीने तिरंगा यात्रा....तळसंदे येथील डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या ५५ विद्यार्थ्यांची विविध कंपनीमध्ये निवड

जाहिरात

 

भारतीय सैन्यदलाप्रति कृतज्ञता आणि सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी कोल्हापुरात काँग्रेसच्या वतीने तिरंगा यात्रा....

schedule24 May 25 person by visibility 326 categoryसामाजिक

▪️विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली तिरंगा यात्रा 

 कोल्हापूर  : भारतीय सैन्यदलाप्रति कृतज्ञता आणि सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी आज शनीवारी काँग्रेसच्या वतीने तिरंगा यात्रा काढण्यात आली. राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून या यात्रेची सुरवात करण्यात आली. भारतमातेचा आणि सशस्त्र दलाच्या तिन्ही दलांसाठी जयघोष करत अत्यंत उत्साहपुर्ण वातावरणात ही तिरंगा यात्रा काढण्यात आली.

  पहलगाम येथे पर्यटकावर दहशतवाद्यांनी  केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनी केलेल्या जवाबी हल्ल्यावेळी दाखवलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच दहशतवादी हल्ल्यात बलिदान दिलेल्या देशाच्या शूर सैनिकांप्रती सद्भावना व्यक्त करण्याकरीता काँग्रेसच्या वतीन आज
शनिवारी कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावरून तिरंगा यात्रा काढण्यात आली. छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळापासून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली. छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून या यात्रेला सुरुवात झाली. खासदार छत्रपती शाहू महाराज तसेच विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही तिरंगा यात्रा काढण्यात आली.

  हातात तिरंगा राष्ट्रध्वज घेऊन काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातात तिरंगा ध्वज होता. यात्रेच्या सुरुवातीला भला मोठा तिरंगा ध्वज, त्याचबरोबर सुरुवातीला माजी सैनिक, त्या मागे काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या, आणि त्यानंतर काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी अशी शिस्तबद्ध रित्या ही तिरंगा यात्रा संपन्न झाली. अत्यंत उत्साहपुर्ण वातावरणात भारतमातेचा आणि सशस्त्र दलाच्या तिन्ही दलांसाठी यावेळी जयघोष करण्यात आला.

राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळा पासुन सुरु झालेली ही यात्रा सीपीआर चौक, महानगरपालिका, भवानी मंडप आणि त्यानंतर बिंदू चौक या ठिकाणी ही यात्रा पोहोचली. यावेळी यात्रेच्या मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तर बिंदू चौक या ठिकाणी यात्रा आल्यानंतर या ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीताने या यात्रेचा समारोप करण्यात आला.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष, तसचं भारत मातेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या यात्रेमध्ये माजी सैनिक देखील मोठ्या संख्येन सहकुटुंब सहभागी झाले होते. त्यांनी देखील यावेळी 
पाकिस्तानच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.

 यावेळी, आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राहूल देसाई, शशांक बावचकर, राजेश लाटकर, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, बयाजी शेळके, शशिकांत खवरे, माजी नगरसेवक राहुल माने, मधुकर रामाणे, संजय मोहिते, ईश्वर परमार, दुर्वास कदम, तौफीक मुल्लाणी यांच्यासह गोपाळराव पाटील, विद्याधर गुरबे, माजी सैनिक, एन. एन. पाटील, रघुनाथ पाटील, रत्नाकर शिरोळे, तानाजी चव्हाण, शिवाजी पाटील यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका आणि जिल्हातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes