कुरुंदवाड आगारात पाच नवीन बसेस दाखल
schedule24 May 25 person by visibility 297 categoryराज्य

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील नागरिकांना अधिक चांगल्या व सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पाठपुरावा केल्याने कुरुंदवाड आगारासाठी पाच नवीन बसेस दाखल झाल्या असून,या बसेसचे पूजन श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील बस स्थानकात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बसस्थानक परिसरात मोठ्या उत्साहात पूजन सोहळा पार पडला.
शिरोळ तालुक्यातील प्रवाशांना दर्जेदार व वेळेत सेवा मिळावी ही माझी प्राथमिकता आहे.यापूर्वीही मी कुरुंदवाड आगाराला १० नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या.आज त्या यादीत पाच नव्या बसेसची भर पडली असून,ही सेवा गावोगावी,तळागाळात पोहोचेल,असा विश्वास यड्रावकर यांनी व्यक्त केला.या नव्या बसेसमुळे शिरोळ तालुका, विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, वेळेत व आरामदायक होणार आहे.
या कार्यक्रमास विभाग नियंत्रक शिवराज जाधव, आगार प्रमुख नामदेव पतंगे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अनिल उर्फ सावकार मादनाईक, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील (टाकवडेकर),शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील,माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, शिरोळ तालुका सहकार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चंद्रकांत मोरे,शिवसेना कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे,बहुजन विकास आघाडीचे नेते रणजीत पाटील,माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील,भाजपा नेते मुकुंद गावडे, सामाजिक कार्यकर्ते दादेपाशा पटेल, अक्षय आलासे,अभिजीत जगदाळे, दीपक गायकवाड,धनाजी जगदाळे, विद्याधर कुलकर्णी,संभाजी भोसले, प्राध्यापक सुनील चव्हाण,बाळासो कोकणे,दयानंद खानोरे,फजल पटेल,सरपंच शफी पटेल, सोमेश गवळी,विकास कदम,शिवसेना महिला आघाडी शिरोळ तालुका प्रमुख अर्चना भोजने,अश्विनी भेंडे, आरती गायकवाड,दिपाली चंदुगडे,संध्या हजारे,रोहिणी सांबरेकर तसेच राज कारेकर,संतोष मोहिते,सौरभ जाधव, रवी भोसले,आशपाक नालबंद आदी मान्यवर उपस्थित होते.