रेल्वे विभागाकडून रु.2 कोटी 89 लाख थकीत पाणीपट्टी वसुल
schedule28 Mar 25 person by visibility 236 categoryमहानगरपालिका

कोल्हापुर : महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाकडून शहरी व ग्रामीण भागातील 785 थकबाकीदार व अनाधिकृत कनेक्शन धारकांचे आजअखेर नळ कनेक्शन खंडित करण्यात आले आहे. आज रेल्वे प्रशासनाकडील थकीत पाणी बिलापोटी 3 नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी रेल्वे विभागाकडून तात्काळ थकीत रक्कम रु.2 कोटी 89 लाख 33 हजार 902 वसुल करण्यात आली.
महानगरपालिकेच्या वतीने थकीत रक्कम एक रक्कमी भरल्यास विलंब आकारामध्ये 50 टक्के सवलत योजना 31 मार्च 2025 अखेर जाहीर करण्यात आली आहे. या सवलत योजनेअंतर्गत आज अखेर सुमारे 25 हजार 456 लाभाथ्यांकडून रक्कम रु.13 कोटी 61 लाख 62 हजार 676 इतकी वसुली करण्यात आली आहे. या सवलत योजनाअंतर्गत 31 मार्च 2025 अखेर जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
तसेच थकबाकीदार व अनधिकृत नळ कनेक्शन धारकांवर येथुन पुढेही हि मोहीम सुरु राहणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी आपली अनाधिकृत नळ कनेक्शन रितसर अर्ज करुन व योग्य ते शुल्क भरुन नियमित करुन पाणी बिलाची रक्कम वेळेवर भरणा करावी. अन्यथा नळ कनेक्शन बंद करणे, वर्तमानपत्रात नाव प्रसिध्द करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखी कारवाई करण्यात येणार असलेचे पाणी पुरवठा विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.