SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
हरोली येथील आरोग्य शिबिरात ४९० नागरिकांची तपासणी'विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता जोपासावी' : निवृत्त मेजर रत्नाकर तिराळे यांचे आवाहनशक्तीपीठ महामार्गाविरोधात १३ जिल्ह्यांचा एल्गार; लातूर, हिंगोलीतून ठिणगी पडणार. शिरोळमधून युतीच्या उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मतदानाची ग्वाहीविरोधकांना आताच ‘पी. एन.’ गटाचा पुळका का आला?गोकुळ संपवणे हाच महायुतीचा अजेंडा : आमदार सतेज पाटील; चुये येथे राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानासोबत संवाद कौशल्ये विकसित करावीत : अकिब शेखआंतरराष्ट्रीय बालिका दिन: मुलींच्या सबलीकरणाचा संकल्प मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सूक्ष्म नियोजन व जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण करा : जिल्हाध्यक्ष विजय जाधवपुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता देवी जाधव आणि शिक्षक मतदार संघातून कौस्तुभ गावडे यांना मताधिक्य देणार : भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील

जाहिरात

 

करवीर तालुक्यात राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ उद्या; दिग्गज नेत्यांची राहणार उपस्थिती

schedule10 Oct 26 person by visibility 332 categoryउद्योग

चुये : करवीर तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचार शुभारंभाचा कार्यक्रम उद्या, रविवार (दि. ११ ऑक्टोबर २०२६) रोजी सकाळी १० वाजता चुये येथील विठ्ठल रखुमाई हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाद्वारे आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे.

या प्रचार शुभारंभ सोहळ्यास विधान परिषदेचे गटर्नेत व आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार बजरंग देसाई, सत्यजित पाटील सरुडकर, राजूबबा आवळे, आमदार ऋतुराज पाटील, गणपतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, सहसंपर्कप्रमुख सुनील शिंत्रे उपस्थित राहणार आहेत.

 तसेच 'गोकुळ' दूध संघाचे माजी संचालक, विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांच्या प्रश्नांवर रणशिंग फुंकण्यासाठी उद्या सकाळी ठीक ११ वाजता चुये येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या पटांगणात हा  कार्यक्रम होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes