SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानासोबत संवाद कौशल्ये विकसित करावीत : अकिब शेखआंतरराष्ट्रीय बालिका दिन: मुलींच्या सबलीकरणाचा संकल्प मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सूक्ष्म नियोजन व जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण करा : जिल्हाध्यक्ष विजय जाधवपुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता देवी जाधव आणि शिक्षक मतदार संघातून कौस्तुभ गावडे यांना मताधिक्य देणार : भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटीलकरवीर तालुक्यात राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ उद्या; दिग्गज नेत्यांची राहणार उपस्थिती‘शिक्षण वाचवा, देश वाचवा!’; गारगोटीत विद्यार्थ्यांची जनजागृती फेरीउद्योजकीय यशासाठी शिस्त, वक्तशीरपणा, कठोर परिश्रम आवश्यक : डॉ. वेर्णेकरभुदरगड महसूल लोक अदालतीत २२ प्रकरणांमध्ये तडजोड; १७६ खातेदारांना लाभपन्हाळा महसूल लोक अदालतीत ३० प्रकरणांमध्ये तडजोड; १४२ खातेदारांना लाभजिल्हास्तरीय पाककृती स्पर्धेतून पोषण विषयक जनजागृती; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विभागाचे कौतुक

जाहिरात

 

विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानासोबत संवाद कौशल्ये विकसित करावीत : अकिब शेख

schedule11 Oct 26 person by visibility 90 categoryशैक्षणिक

 ▪️ डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये करिअर मार्गदर्शनपर व्याख्यान

  कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे मायक्रोसॉफ्टचे कॅम्पस रिक्रूटमेंट स्पेशालिस्ट अकिब शेख यांचे करिअर मार्गदर्शनपर सत्र संपन्न झाले. दोन दिवसांच्या या मार्गदर्शन सत्रामध्ये अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, व्यक्तिमत्त्व विकास, औद्योगिक क्षेत्रातील अपेक्षा आणि कॅम्पस प्लेसमेंटची तयारी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विविध तज्ज्ञांनीही या सत्रात सहभाग घेतला.या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील बदलत्या गरजा आणि रोजगाराच्या संधी यांची माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन करून त्यांना करिअर नियोजनासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

  विद्यार्थ्यांनी नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळविण्यासाठी जिद्द, सातत्य आणि योग्य तयारी ठेवणे आवश्यक असल्याचे अकिब शेख यांनी सांगितले. ते म्हणाले, “आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक गुणवत्तेवर अवलंबून न राहता तांत्रिक ज्ञान, कोडिंगमधील प्रावीण्य आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक आहे. उद्योगक्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी वास्तविक जीवनातील समस्यांचा अभ्यास करून त्यावर नावीन्यपूर्ण उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा. तसेच हॅकेथॉन, समूहचर्चा (ग्रुप डिस्कशन) आणि विविध तांत्रिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपली कौशल्ये अधिक सक्षम करावीत. मुलाखतीच्या प्रक्रियेत आत्मविश्वास, प्रभावी संवाद कौशल्य आणि विषयाचे सखोल ज्ञान यांना विशेष महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी सातत्याने नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःचे मूल्यमापन करावे आणि बदलत्या औद्योगिक गरजांनुसार स्वतःला अद्ययावत ठेवावे. योग्य नियोजन, कठोर परिश्रम आणि शिकण्याची जिद्द यांच्या जोरावर विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये करिअर घडविण्याच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.”

  संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी म्हणाले, "स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी उद्योगक्षेत्राच्या बदलत्या गरजांनुसार आपले तांत्रिक ज्ञान, कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकसित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडविण्याची क्षमता, आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि सतत नवीन शिकण्याची वृत्ती निर्माण झाल्यास त्यांना उज्ज्वल करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतील". 
संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी आपल्या संदेशात म्हटले की, “विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा सातत्याने विकास करणे ही काळाची गरज आहे. शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नावीन्यपूर्ण विचारसरणी आणि आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे. ” 

  इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी प्रास्ताविक केले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे या उपक्रमासाठी मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी संचालक (ट्रेंनिंग अँड प्लेसमेंट ) डॉ. करण पाटील, एमबीए विभागप्रमुख डॉ. विराज जाधव, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग सहाय्यक प्रा. श्रेया मोहोळकर , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes