SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शक्तीपीठ महामार्गाविरोधात १३ जिल्ह्यांचा एल्गार; लातूर, हिंगोलीतून ठिणगी पडणार. शिरोळमधून युतीच्या उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मतदानाची ग्वाहीविरोधकांना आताच ‘पी. एन.’ गटाचा पुळका का आला?गोकुळ संपवणे हाच महायुतीचा अजेंडा : आमदार सतेज पाटील; चुये येथे राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानासोबत संवाद कौशल्ये विकसित करावीत : अकिब शेखआंतरराष्ट्रीय बालिका दिन: मुलींच्या सबलीकरणाचा संकल्प मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सूक्ष्म नियोजन व जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण करा : जिल्हाध्यक्ष विजय जाधवपुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता देवी जाधव आणि शिक्षक मतदार संघातून कौस्तुभ गावडे यांना मताधिक्य देणार : भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटीलकरवीर तालुक्यात राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ उद्या; दिग्गज नेत्यांची राहणार उपस्थिती‘शिक्षण वाचवा, देश वाचवा!’; गारगोटीत विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी

जाहिरात

 

विरोधकांना आताच ‘पी. एन.’ गटाचा पुळका का आला?

schedule11 Oct 26 person by visibility 186 categoryउद्योग

🟣 राहुल पाटील यांचा सतेज पाटील यांना टोला
🟣 ‘हलसिध्दनाथा’ची शपथ घेतली आहे, पॅनेल टु पॅनेलच मतदान -नरके

कोल्हापूर : दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचा गट अडचणीत असताना आम्हाला सोडून विरोधकांसोबत गेला. आता त्याच विरोधकांना आमच्या गटाचा पुळका का आला? असा सवाल करत शेवटच्या टप्यात विरोधकांकडून अफवा पसरवल्या जातील, पण पी. एन. पाटील यांची शपथ घेऊन सांगतो, महायुतीच्या सर्व उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मतदान करु, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी दिली. 

‘गोकुळ’ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कोल्हापूरात झालेल्या करवीर तालुक्यातील ठरावधारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ प्रमुख उपस्थित होते. 

आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, गेल्या पाच वर्षात उच्चांकी दूध दरवाढ देत असतानाच पारदर्शी कारभाराच्या माध्यमातून उलाढाल ४२०० कोटीपर्यंत नेली आहे. घरात भांड्याला भांडे लागल्यानंतर आवाज येतो. त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपावरुन थोडे वर खाली झाले असेल. माझ्या जीवनात संघर्ष नवा नाही. कॉलेज जीवनापासून संघर्ष सुरु असून संजय मंडलीक म्हणाल्याप्रमाणे मी काही चाणक्य नाही. पॅनेलमध्ये चार जागा मिळाल्या त्यातील विश्वास पाटील यांची एक आणि उर्वरित तीन जागा मी पळून रना काढून घेतल्या आहेत. त्यामध्ये मला कोणी रनआऊट केले नाही. 
गेल्या दोन दिवसापासून मला फोन येत आहेत. मी त्यांना सांगितले असे काही होणार नाही. हालसिध्दनाथला जाऊन आलोय त्यामुळे आत बाहेर काही होणार नाही, पॅनेल टू पॅनेल मतदान होईल. 

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, करवीरमध्ये प्रत्येक वेळी काहीतरी गडबड होत असल्याचा डाग आहे. या पॅनेलची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर सोपवली आहे. काही झाले तर माझी अब्रू जाईल. जागा वाटपात पी. एन. पाटील यांच्या गटाला एकच जागा मिळाली. बाळासाहेब खाडे यांनी आपण थांबून नेत्याला संधी दिली. या गटाला पाच वर्षे स्वीकृत पद तर देणार आहेच, जिल्हा बँकेतही सन्मान करू.

‘गोकुळ’चे माजी संचालक बाळासाहेब खाडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अजित नरके, माजी खासदार संजय मंडलीक, शौमिका महाडीक यांनी मनोगत व्यक्त केले.

 आमदार अमल महाडीक, माजी आमदार संजय घाटगे, राजेश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील आदी उपस्थित होते. अजित पाटील यांनी आभार मानले. 


🟣 पालकमंत्री आम्हा सर्वांना भारी पडले....
आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, मला चार जागा मिळाल्या म्हणून संजय मंडलीक मला ’चाणक्य’ म्हणाले, पण मी चाणक्य नाही एक जागा विश्वास पाटील यांची होती. शेवटच्या तीन रना मी पळून काढल्या, त्यात मी रनआऊट झालो नाही. पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी शेवटी पालकत्व घेतले, ते आम्हा सर्वांना भारी पडले.


🟣 ‘चंद्रदीप’ ठरावधारक बाहेर काढा.....
चंद्रदीप नरके हे हुशार माणूस आणि चिकाट आहेत. ठरावधारकांना ते हलवणार नाहीत, काहीतरी मिमिक्री करणार असल्याचे सांगत आहेत. पण, तसे करू नका, माणसे बाहेर काढा, त्यांच्या शपथा घेतल्या पाहिजेत, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

🟣 ठराव गोळा करताना सर्वाधिक जखमा मलाच.....
ठराव गोळा करताना बरेच युद्ध झाले. यामध्ये सर्वाधिक जखमा मलाच झाल्या. असे सांगत शौमिका महाडीक तुम्हाला वहिणी नाही सूनबाईच म्हणतो, असे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes