कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी राजेश पाटील
schedule23 Jul 24 person by visibility 979 categoryसामाजिक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी काँग्रेसचे राजेश पांडुरंग पाटील यांची सोमवारी निवड झाली. बँकेचे संचालक व दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी ही निवड निवडणूक प्रक्रियेतून करण्यात आली.
रिक्त पदाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. सोमवारी सकाळी करवीर तालुका विकास संस्था गटातून राजेश पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली. पाटील यांचे नाव बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सूचवले त्यास आमदार सतेज पाटील यांनी अनुमोदन दिले.
यावेळी राजेश पाटीलयांचा सत्कार बँकेचे अध्यक्ष पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक आदी पदाधिकारीमान्यवर उपस्थित होते.