SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जुने वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास नव्यासाठी १५ टक्के कर सवलतडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून धम्मातील मूल्ये संविधानाद्वारे देशाला प्रदान: डॉ. आलोक जत्राटकरकर्करोग उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांच्या निर्मितीसाठी पेटंट; डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांचे यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सिमावासियांना आशा...!जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारीग्रामपंचायत नंदगावमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर संपन्नउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशांमुळे कोल्हापूरात ‘आयटीहब’ उभारण्याचा मार्ग मोकळाराष्ट्रीय कव्वाली स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचा द्वितीय क्रमांकपंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत 1 लाख 61 हजार जमानरेंद्रचार्य महाराज भक्त सेवा मंडळ तर्फे भव्य नरेंद्रचार्य महाराज भक्त सेवा मंडळ तर्फे भव्य लक्षवेधी शोभायात्रा शोभायात्रा

जाहिरात

 

रमजान ईद (ईदु-ल-फित्र) उद्या सोमवारी

schedule30 Mar 25 person by visibility 207 categoryराज्य

कोल्हापूर :  हिलाल कमिटी [चांद कमिटी] ची बैठक मौ. मन्सूर आलम कासमी यांचे अध्यक्षतेखाली मुस्लिम बोर्डीग, कार्यालयामध्ये आज रविवारी सायंकाळी मगरीब नमाज पठनानंतर झाली. या बैठकीमध्ये  मुंबई हिलाल कमिटी, बेंगलोर, लखनौ, दिल्ली, देवबंद, आमारते शरिआ पटना या सर्व हिलाल कमिटी, तसेच अन्य शहरांशी संपर्क साधण्यात आला . सदर ठीकाणाहून चंद्रदर्शनाची साक्ष मिळाल्याने रमजान ईद उद्या सोमवार दि.31 मार्च रोजी साजरी होणार आहे. या बाबतचा निर्णय उलमा हिलाल कमिटीचे अध्यक्ष मौ. मन्सूरआलम कासमी यांनी जाहीर केले. 

या प्रसंगी मौ इरफान कासमी, मौ. नाझिम पठाण, मौ. अब्दुलसलाम कासमी, मौ.अ. रऊफ नाईकवडे, मौ. मुबीन बागवान,, मुफ्ती ताहीर बागवान हाफीज समीर उस्ताद, मौ अनिस अहमद सय्यद,  हाकीज ताफिक सय्यद मौ अझहर सय्यद,   मुफ्ती अशरफ खान, मौ मोहसिन बागवान, मौ साजिद शेख,  रफिक सनदी, शहजादा पखाली. मौ साद कोरोची, हाफीज तौफिक सय्यद, खुशिद आलम कासमी, हाफीज अबूतालिब सय्यद, हाफीज  हाफीज जैद मुल्ला मौ फैयाज  अत्तार यावेळी उपस्थित होते.

तसेच मुस्लिम बोडींगचे सर्व पदाधिकारी, कोल्हापूर शहर व उपनगरातील सर्व मसजिदचे पेशइमाम व अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते .

▪️मुस्लिम बोर्डीग येथे रमजान ईदच्या नमाजची वेळ ठिक सकाळी 9.30 वाजता तसेच कोल्हापूर शहरातील इतर मस्जिदचे रमजान ईद नमाजचे वेळापत्रक खालील प्रमाणे

नमाजची वेळ 8.00- निहाल पैलवान मसजिद (मरकज), सदरबझार मसजिद, शेखचाचा मसजिद वाय पी पोवारनगर,

▪️ वेळ 8.15 - मणेर मसजिद,

▪️वेळ 8 .30 - ईदगाह मैदान नंगीवली, राजेबागस्वार मसजिद, विकमनगर मसजिद, जमादार कॉलनी मसजिद, लक्षतीर्थ नवी मसजिद, विडी कॉलनी मसजिद, राजोपाध्येनगर मसजिद, सिरत मोहल्ला मसजिद

▪️8.45 - यादवनगर मसजिद, केसापूर मस्जिद

▪️9.00 - कब्रस्तान मसजिद, घोडणपीर मसजिद, लाईनबझार मसजिद, गवंडी मोहल्ला मसजिद, प्रगती कॉलणी मसजिद, लक्षतिर्थ पुरानी मसजिद, अकबर मोहल्ला मसजिद युनिकपार्क मसजिद लिशा हॉटेल,  मुडशिंगी मसजिद, टाकाळा मदीना मसजिद, शाहुपूरी थोरली मसजिद, बाराईमाम,
 कदमवाडी मस्जिद, सरदार कॉलनी मस्जिद, ईदगह बावडा,साकोली मास्जिद, फुलेवाडी मास्जिद,

▪️9.15 -बाबुजमाल मसजिद, उत्तरेश्वर मसजिद, बडी मसजिद,

▪️9.30
मुस्लिम बोर्डीग हॉस्टेल मसजिद, कसाब मसजिद,
 
असे निवेदन मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे .

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes