कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रमजानईद मोठया उत्साहात साजरी
schedule31 Mar 25 person by visibility 268 categoryसामाजिक

* खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची मुस्लिम बोर्डिंग येथे भेट, दिल्या शुभेच्छा
कोल्हापूर : मुस्लिम बांधवांचा रमजान ईद [ ईदुल फित्र] हा सण सोमवार दि. 31 मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला. रमजान ईदची नमाज परंपरागत पध्दतीने मुस्लिम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर करण्यात आली. या ठिकाणी पहील्या जमाती करीता मुफ्ती इरशाद कुन्नुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन व नमाज पठन केले. तर दुसऱ्या जमातच्या नमाजकरीता हाफीज आकिब म्हालदार, तिसरी जमातसाठी मौलाना राहमतुल्ला कोकणे यांनी नमाज पठण केले .
याठीकाणी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देणेसाठी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, विजय देवणे, रियाज सुभेदार, बापूसो मुल्ला, नासिर धारवाडकर, अजित टिके डी वाय. एस पी, श्रीराम कनेरकर पोलिस निरिक्षक लक्ष्मीपुरी, धिरज कुमार बच्चू अप्पर पोलीस अधीक्षक , सर्व पत्रकार, छायाचित्रकार यासह सर्व धर्मियांचे मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत संस्थेचे प्रशासक कादरभाई मलबीरी यांनी केले. तर मान्यवरांचे आभार संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर यांनी मानले.
याठीकाणी सर्वानी मिळून कोल्हापूरची व देशाची एकात्मता तसेच सुखाशांती अबाधित रहावी म्हणून प्रार्थना केली.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांना मुस्लिम बोर्डिंगचे उपाध्यक्ष आदील फरास, संचालक हाजी पापाभाई बागवान, हाजी. लियाकत मुजावर, हाजी. जहांगीर अत्तार, रफीक शेख, रफीक मुल्ला, फारूक पटवेगार, अल्ताफ झांजी, मलिक बागवान यांचे हस्ते शिरखुरम्याचे वाटप करण्यात आले.
कोल्हापूर शहरातील निहाल पैलवान मसजिद (मरकज), सदरबझार मसजिद, शेखचाचा मसजिद वाय पी पोवारनगर, मणेर मसजिद, ईदगाह मैदान नंगीवली, राजेबागस्वार मसजिद, विकमनगर मसजिद, जमादार कॉलनी मसजिद, लक्षतीर्थ नवी मसजिद, विडी कॉलनी मसजिद, राजोपाध्येनगर मसजिद, सिरत मोहल्ला मसजिद, यादवनगर मसजिद, केसापूर मस्जिद, कब्रस्तान मसजिद, घोडणपीर मसजिद, लाईनबझार मसजिद, गवंडी मोहल्ला मसजिद, प्रगती कॉलणी मसजिद, लक्षतिर्थ पुरानी मसजिद, अकबर मोहल्ला मसजिद युनिकपार्क मसजिद लिशा हॉटेल, मुडशिंगी मसजिद, टाकाळा मदीना मसजिद, शाहुपूरी थोरली मसजिद, बाराईमाम, कदमवाडी मस्जिद, सरदार कॉलनी मस्जिद, ईदगाह बावडा,साकोली मास्जिद, फुलेवाडी मास्जिद, बाबुजमाल मसजिद, उत्तरेश्वर मसजिद, बडी मसजिद, मुस्लिम बोर्डीग हॉस्टेल मसजिद, कसाब मसजिद मध्ये रमजान ईद ची नमाज पठण व कुतबा पठण करण्यात आले. तसेच समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी मस्जिद व ईदगाह मैदानावरती नमाज पठण करण्यात आले. सामाजिक ऐक्य जपत मुस्लिम बांधवांनी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली.
