रामानुजन यांचे गणितातील योगदान महत्वाचे : प्रा. डॉ. एस. एच. ठकार
schedule30 Dec 25 person by visibility 55 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विशेष ऑनलाईन व्याख्यानात प्रतिपादन
कोल्हापूर : रामानुजन यांचे गणितातील योगदान महत्वाचे आहे. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या माजी अधिष्ठाता तथा गणित अधिविभागाच्या माजी प्रमुख प्रा. डॉ. एस. एच. ठकार यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या दूर शिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने 'राष्ट्रीय गणित दिना'चे औचित्य साधून विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'श्रीनिवास रामानुजन यांचे कार्य : कॉन्ग्रुअन्स प्रोप्रटीज ऑफ पार्टिशन’ विषयावर प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे उपकुलसचिव श्री.विनय शिंदे होते. यावेळी सहाय्यक कुलसचिव श्री. दिलीप मोहाडीकर,समन्वयक डॉ. चांगदेव बंडगर,सहाय्यक प्राध्यापक व विविध विभागांचे समन्वयक व विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाईन सहभागी झाले होते. श्रीनिवास रामानुजन यांच्या गणितीय प्रवासाचा आढावा घेतला.





