जलद बुद्धिबळ स्पर्धा रविवारी
schedule10 Feb 26 person by visibility 191 categoryक्रीडा
कोल्हापूर : एकदिवशी सोळा वर्षाखालील मुलांची बुद्धिबळ स्पर्धा रविवार दि. 22 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. अनुज् चेस ॲकॅडमी व डी आर माने महाविद्यालय यांचे वतीने १६ वर्षांखालील मुला-मुलींची शालेय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी डी आर माने महाविद्यालय, कागल येथे ही स्पर्धा होईल.
स्पर्धा १६ वर्षांखालील वयोगटातील सर्व मुलांची एकत्रित एकच स्पर्धा होईल. (जन्म तारीख : १ जानेवारी २०१० किंवा त्यानंतर), इतर वयोगटात बक्षिसे १४ वर्षांखालील (१/१/२०१२ किंवा त्यानंतर), १२ वर्षांखालील (१/१/२०१४ किंवा त्यानंतर), १० वर्षांखालील (१/१/२०१६ किंवा त्यानंतर), ८ वर्षांखालील (१/१/२०१८ किंवा त्यानंतर). दि. 21 फेब्रुवारी पर्यंत सहभाग नोंदवावा.
स्पर्धकांनी स्वतःचा बुद्धिबळपट, चेस क्लॉक, टिफीन घेऊन सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक कृष्णात पाटील (९४२११०४६५०), बाबूराव पाटील (९४२२७९०४९५), डॉ. श्रीनिवास पाटील 9422415818 प्रा. संग्राम तोडकर 9422045741 (क्रीडा शिक्षक - डी आर माने महाविद्यालय), अनुष्का पाटील यांनी केले आहे.