कागल मध्ये रविवारी जलद बुद्धिबळ स्पर्धा
schedule08 Mar 26 person by visibility 263 categoryक्रीडा
कोल्हापूर : एक दिवशी सतरा वर्षाखालील मुलांची बुद्धिबळ स्पर्धा रविवार दि. 22 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. श्रीमंत नारायणीराजे अखिलेशसिंहराजे घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू उत्कर्ष फ्रेंड्स सर्कल, कागल यांच्या वतीने व अनुज् चेस ॲकॅडमीच्या सहकार्याने १७ वर्षाखालील मुलामुलींची जलद बुद्धिबळ कागल मध्ये आयोजित केली आहे.
स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास रु. 1500, द्वितीय क्रमांकास रु. 1000, तृतीय क्रमांकास रु. 700, चौथ्या क्रमांकास रु. 500 व पाचव्या क्रमांकास रु. 300 अशी रोख बक्षीसे, 15 चषक तसेच 32 मेडल्स (पदके) अशी एकूण 47 बक्षीसे ठेवली आहेत. रविवार, दि. 22 मार्च रोजी यशवंतराव घाटगे हायस्कूल, कागल येथे ही स्पर्धा होईल.
स्पर्धा 17 वर्षांखालील वयोगटातील सर्व मुलांची एकत्रित एकच स्पर्धा होईल. (जन्म तारीख : १ जानेवारी २००९ किंवा त्यानंतर), इतर वयोगटात बक्षिसे १५ वर्षांखालील (१/१/२०११ किंवा त्यानंतर), १३ वर्षांखालील (१/१/२०१३ किंवा त्यानंतर), ११ वर्षांखालील (१/१/२०१५ किंवा त्यानंतर), ९ वर्षांखालील (१/१/२०१७ किंवा त्यानंतर), ७ वर्षांखालील (१/१/२०१९ किंवा त्यानंतर).
दि. 21 मार्च पर्यंत सहभाग नोंदवावा. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. स्पर्धकांनी आधार कार्ड, स्वतःचा बुद्धिबळपट, चेस क्लॉक घेऊन सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक कृष्णात पाटील (९४२११०४६५०), बाबूराव पाटील (९४२२७९०४९५), राजू कचरे (८५३०४५५९४७), अनुष्का पाटील (९३०७२९५८४८), अनुराग पाटील (८६०५७३२७३१) यांनी केले आहे.