पंचगंगा घाटावरील रोष्णाईबाबत...
schedule02 Dec 25 person by visibility 50 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2022-23 अंतर्गत नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेमार्फत पंचगंगा घाट परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईची कामे करण्यात आली आहेत. या कामांमध्ये नदीपात्रातील ऐतिहासिक मंदिरांवर एलईडी लाईटची स्थापना, छत्रपती शिवाजी पुलाच्या घाटाकडील बाजूस एलईडी लाईट बसविणे, घाटावरील हेरिटेज वास्तूंना आकर्षक उजळणी, तसेच पिकनिक पॉईंट गार्डनमध्ये विशेष रोषणाई उभारण्याचा समावेश आहे. याशिवाय पंचगंगा घाट परिसरात हेरिटेज प्रकारातील आकर्षक विद्युत खांबही बसविण्यात आले आहेत.
पंचगंगा घाट परिसर दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या पाण्याखाली जात असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने उंच हेरिटेज पोलवरील लाईट वगळता इतर सर्व फिटींग इन्ग्राउंड लाईट्स आणि लिनीअर लाईट्स निविदेच्या अटी व शर्तीप्रमाणे संबंधित ठेकेदारामार्फत काढून सुरक्षित ठेवण्यात येतात. पुराचे पाणी ओसरल्यानंतर साचलेला गाळ हटवून आवश्यक डागडुजी केली जाते आणि सर्व लाईट पुन्हा बसवून समाधानकारक ट्रायल घेतली जाते.
या अनुषंगाने कामकाज करण्याबाबत महानगरपालिकेकडून संबंधित ठेकेदारास 29 ऑक्टोबर 2025 रोजीच सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सध्या ठेकेदारामार्फत काम सुरू असून, सर्व लाईट प्रोग्रामिंगची प्रक्रिया सुरू आहे. प्रोग्रामिंगसाठी काही दिवस लागणार असले तरी, येणाऱ्या 8 दिवसांत पंचगंगा घाटावरील संपूर्ण विद्युत रोषणाई सुरू होणार आहे.