आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेत कोल्हापूरच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी!
schedule19 Aug 26 person by visibility 70 categoryराज्य
◼️कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी पटकावले यश; दिया दापके, निहाल मुलतानी ठरले प्रथम
कोल्हापूर : देवभूमी हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट, मौ. जावळी (आंबा घाट, जि. कोल्हापूर) आणि सांगलीचे यशस्वी प्रमोटर किशोर प्रभाकर पटवर्धन यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेत, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या 'कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूर'च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
'देवभूमी हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट'च्या परिसरातील मानवनिर्मित (कृत्रिम) धबधबा या नाविन्यपूर्ण विषयावर ही स्पर्धा आधारित होती. या स्पर्धेचा नुकताच अत्यंत उत्साहात अंतिम फेरी व पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.
विद्यार्थ्यांचे चमकदार यश: प्रथम क्रमांक (गोल्ड): दिया दापके आणि निहाल मुलतानी (अंतिम वर्ष, वास्तुकला शाखा), द्वितीय क्रमांक (सिल्व्हर): शर्वत हावळ (अंतिम वर्ष, वास्तुकला शाखा)
मान्यवरांचे मार्गदर्शन व परीक्षक : या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेसाठी ज्येष्ठ वास्तुविशारद महाजनी आणि वास्तुविशारद राहुल पाटील यांनी परीक्षक म्हणून अत्यंत जबाबदारीने काम पाहिले.
या उज्ज्वल यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य चिदंबर दुदगीकर आणि चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन विद्यार्थ्यांना लाभले. तसेच, आयक्यूएसी समन्वयक प्रा. मनोरमा पाटील आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांना विशेष सहकार्य केले.