SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गुणवत्तेसोबत ग्राहक सुविधांना ‘गोकुळ’चे प्राधान्य : डॉ. योगेश गोडबोलेटाकळी येथे औद्योगिक वसाहतीसह सैनिकांच्या सर्व मागण्या पूर्ण करणार : नामदार उदय सामंतजागतिक हेलियम दिन: एक वैज्ञानिक पर्व आणि महाराष्ट्राचा अभिमानकोल्हापुरात १ कोटी ९५ लाखांची गोव्यातील अवैध दारू जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाईसहकार उपनिबंधकांकडून अवसायनातील २९८ दूध संस्थाही मतदानास पात्रडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्रामसाठी निवडकोल्हापूर : रंकाळा परिसरातील अनधिकृत हातगाडयांविरोधात व्यापक मोहीम ; विभागांनी समन्वयाने कारवाई करावी : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडकेडीसीसी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ फरकाचा तिसरा हप्ता वर्ग; गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यात उत्साह आणि आनंद येत्या महिन्याभरात विविध मंत्र्याकडे बैठका लावणार : मंत्री हसन मुश्रीफशिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कार जाहीर

जाहिरात

 

गुणवत्तेसोबत ग्राहक सुविधांना ‘गोकुळ’चे प्राधान्य : डॉ. योगेश गोडबोले

schedule18 Aug 26 person by visibility 76 categoryउद्योग

◼️ताराबाई पार्क येथे नूतनीकृत ‘गोकुळ शॉपी’चे उद्घाटन

कोल्हापूर  : गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांना सहज उपलब्ध व्हावेत आणि ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयाच्या आवारातील ‘गोकुळ शॉपी’चे नूतनीकरण करण्यात आले आहे. प्रशासकीय मंडळाचे सदस्य सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परुळेकर आणि कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतनीकृत ‘गोकुळ शॉपी’चे उद्घाटन करण्यात आले.

  नूतनीकृत शॉपीला आकर्षक आणि सुसज्ज स्वरूप देण्यात आले आहे. येथे ग्राहकांना गोकुळचे दूध तसेच विविध दुग्धजन्य पदार्थ एकाच ठिकाणी मिळणार आहेत. तसेच लस्सी, आईस्क्रीम यांसारख्या पदार्थांचा आस्वाद घेता यावा, यासाठी शॉपीमध्ये ग्राहकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

  यावेळी बोलताना कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले म्हणाले, “गुणवत्तापूर्ण दूध व उत्पादने हीच गोकुळची ओळख आहे. गोकुळने गुणवत्तेच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी ग्राहकांना दर्जेदार उत्पादने सहज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ग्राहकांना चांगल्या सुविधा देणे हे गोकुळचे प्राधान्य आहे. ग्राहकांच्या सोयीचा विचार करूनच ताराबाई पार्क येथील गोकुळ शॉपीचे नूतनीकरण करण्यात आले आहे.”

ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयात दूध उत्पादक, ग्राहक, शासकीय अधिकारी आणि विविध मान्यवरांची नियमित ये-जा असते. त्यांना गोकुळचे दूध, दही, ताक, लस्सी, बासुंदी, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, पनीर, तूप, टेबल बटर, कुकिंग बटर, दूध पावडर, पेढा, फ्लेवर्ड मिल्क, गुलाबजामून,चीज, आईस्क्रीम  यांसह विविध दुग्धजन्य पदार्थ या शॉपीमध्ये उपलब्ध होणार आहेत. नूतनीकरणामुळे ग्राहक आणि दूध उत्पादकांसाठी ‘गोकुळ शॉपी’ अधिक सोयीची ठरणार आहे.

 उद्घाटनप्रसंगी गोकुळचे प्रशासकीय मंडळाचे सदस्य सागर बलकवडे,डॉ.चंद्रकांत परुळेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, सिव्हील व्यवस्थापक प्रकाश आडनाईक, बाजीराव राणे, डॉ.एम.पी.पाटील, लक्ष्मण धनवडे, शॉपी चालक मंगेश गुरव, संघाचे कर्मचारी तसेच दूध उत्पादक व ग्राहक उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes