अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया व डॉ.एस. पी. पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद
schedule07 Mar 25 person by visibility 560 categoryआरोग्य

इचलकरंजी : अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया शाखा इचलकरंजी व डॉ एस. पी. पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, कोरोची यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव बाजार समिती, इचलकरंजी येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात अनेक नागरिकांनी उपस्थित राहून मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.या आरोग्य तपासणीमध्ये 198 रुग्णांनी लाभ घेतला. तर आरोग्य विषयक सर्व्हे टीमने सुमारे 1700 लोकांचे सर्व्हे पूर्ण केले.
या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाचे सर्व जिल्हा संचालक (डिस्टिक डायरेक्टर) आणि राज्य संचालक (स्टेट डायरेक्टर) उपस्थित होते.
▪️शिबिरातील सेवा व तपासण्या
या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात विविध आजारांची तपासणी व वैद्यकीय सल्ला देण्यात आला. शिबिरामध्ये खालील तपासण्या व उपचार सेवा पुरवण्यात आल्या –
सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब (BP) व मधुमेह (Sugar) तपासणी, हृदयविकार तपासणी व सल्ला, आयुर्वेदिक पद्धतीने आरोग्य सुधारणा मार्गदर्शन, औषधोपचार आणि जीवनशैली सुधारणा सल्ला
या आरोग्य शिबिरात डॉ एस. पी. पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी मोफत तपासणी करून नागरिकांना आवश्यक सल्ला दिला. तसेच औषधोपचार, योग्य आहार आणि जीवनशैली याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे इचलकरंजी व परिसरातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली. प्रकाश आवाडे यांनी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मदत मिळावी, या हेतूने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. तसेच अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक सल्ला मिळवल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया डॉ .एस. पी. पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या संयुक्त प्रयत्नातून संपन्न झालेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. आयोजक माननीय सचिन देसाई अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया स्टेट डायरेक्टर यांनी भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.