SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सेवा आणि समर्पणाचा आधारवड: जागतिक परिचारिका दिनडीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा व बी.टेक.च्या आठ विद्यार्थ्यांची वेलस्पनमध्ये निवडआपत्ती व्यवस्थापन मान्सून पूर्वतयारी १५ दिवसात पूर्ण करा; अलमट्टी व हिप्परगीबाबत स्ट्राँग मॉनीटरींग गरजेचे : पालकमंत्री प्रकाश आबिटकर स्त्रीशक्तीच्या कौशल्यातून उ‌द्योग उभारणी शक्य: कविता देसाईशिप्पूरचे श्री. रामलिंग देवस्थान या परिसराचे तीर्थस्थळ बनेल : मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वासविभागीय कार्यालयांचे विकेंद्रीकरण; पुढील महिनाभरात सक्षम कामकाजाचे नियोजन करागोकुळच्या ११०० संस्थांचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवावा; आमदार सतेज पाटील यांची आक्रमक भूमिकाकागल-गडहिंग्लज-उत्तूर मतदारसंघातील सर्वच शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील : मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाहीथकबाकी असलेल्या गाळयांना 31 मे पर्यंत अंतीम मुदत, अन्यथा 1 जून पासून गाळे सील : आयुक्त डॉ.राजेंद्र भारुडसमाजस्वास्थ्यासाठी वारकरी संप्रदायाचे योगदान अलौकिक : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

जाहिरात

 

मुंबईतील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनुरकरचा डंका; पटकावला पाचवा क्रमांक!

schedule25 Mar 26 person by visibility 273 categoryक्रीडा

कोल्हापूर: नवी मुंबई, नेरूळ येथे संपन्न झालेल्या 'अंजनीबाई चेस अकादमी' आयोजित आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनुरकर याने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. ५२० खेळाडूंच्या अटीतटीच्या लढतीत ऋषिकेशने पाचवा क्रमांक पटकावत कोल्हापूरच्या क्रीडा वैभवात भर घातली आहे.

एकूण ९ फेऱ्यांच्या या स्पर्धेत ऋषिकेशने अत्यंत संयमी खेळ केला. शेवटच्या नवव्या फेरीत विजय मिळवत त्याने ८ गुणांची कमाई केली. या यशाबद्दल त्याला ८,००० रुपये रोख, आकर्षक चषक आणि ८ फिडे मानांकन गुण देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत एकूण ३ लाख रुपयांची बक्षीसे आणि २५० चषक ठेवण्यात आले होते, ज्यात ३१३ मानांकित खेळाडूंसह एकूण ५२० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. रायगडचा भोईर पारस दिलीप हा ८.५ गुणांसह या स्पर्धेचा विजेता ठरला.

ऋषिकेश हा कोल्हापूरमधील विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी असून तो ताराबाई पार्क येथील 'अनुज अकॅडमी'मध्ये बुद्धिबळाचा सराव करतो. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे आणि प्राचार्य डॉ. सी.बी. पाटील यांनी त्याचे कौतुक केले आहे.

ऋषिकेशला जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे तसेच कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे माजी सेक्रेटरी कृष्णात पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes