सायबर येथे १९ ते २० सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
schedule16 Sep 25 person by visibility 87 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसचे कोल्हापूर व युनिव्हर्सिटी ऑफ वायुनिया श्रीलंका, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, मॉरीशस व कादंबरी मेमोरियल कॉलेज ऑफ सायन्स अँड मॅनेजमेंट, नेपाल या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19 व 20 सप्टेंबर 2025 रोजी भविष्याचे परिवर्तन व्यवस्थापन, तंत्रज्ञान, सामाजिक परिणाम आणि पर्यावरणीय जबाबदारी यामधील नवकल्पना त्या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आनंद भवन, सायबर कॅम्पस येथे आयोजन करण्यात आले आहे.
नुकतीच सायबर महाविद्यालयाची राष्ट्रीय पातळीवर एन. आय. आर. एफ 2025 मानांकनामध्ये स्थान पटकावले आहे. शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एनआयआरएफ (National Institutional Ranking Framework) 2025 मध्ये सायबर महाविद्यालयाचा राष्ट्रीय पातळीवरील महाविद्यालयीन श्रेणीत २०१-३०० या रैंक बँडमध्ये स्थान मिळाले आहे. सायबर संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टलेचा हा सन्मान कोल्हापूरसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
एनआयआरएफ हा भारत सरकार मान्य केलेला निकष आहे, ज्यामध्ये अध्यापन-शिकवण, संशोधन, पदवीधरांचे यश, समाजाशी नाळ, संस्थेची प्रतिष्ठा आदी महत्वाचे घटक तपासून उच्च शिक्षण संस्थांना राष्ट्रीय स्तरावर स्थान दिले जाते. त्यामुळे एनआयआरएफ रैंकिंग हे विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या गुणवत्तेचे विश्वासार्ह प्रमाणपत्र मानले जाते.
सदर आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी 100 हून अधिक संशोधन पेपर सहभागी होणार आहेत. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेमधून व्यवस्थापन, तंत्रज्ञान, सामाजिक परिवर्तन व पर्यावरणीय जबाबदारी या चार घटकावर आधारित नावीन्यपूर्ण संकल्पना मांडल्या जाणार आहेत.
सदर परिषद यशस्वी करण्यासाठी सायबर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रणजित शिंदे आणि संचिव सीए. एच. आर. शिंदे, प्रभारी संचालिका डॉ. बिंदू मेनन यांचे दूरदर्शी मार्गदर्शनाने Organizing Committee प्रयत्न करत आहेत.
पत्रकार बैठकीस सायबर कॉलेज संचालिका डॉ. बिंदू मेनन, एमबीए डिपार्टमेंटच्या अधिष्ठांता प्रा. मथुरा माने व समाजकार्य विभागाचे डॉ. दिपक भोसले यांनी माहिती दिली