SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महाराष्ट्रातील आयटीआय होणार सर्वोत्तम ‘स्किल डेव्हलमपेंट हब’ : मंत्री मंगलप्रभात लोढामहात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन मंत्रालयाशेजारील उद्यानात सर्वधर्मीय प्रार्थनाडीकेटीईचे स्पोर्टसमध्ये सीओईपी, पुणे येथील झेस्ट २के२६ स्पर्धेत ८खेळांमध्ये घवघवीत यशशिवाजी विद्यापीठात हुतात्मा दिनपरराज्यातील अवैध मद्य वाहतूकप्रकरणी कारवाई; १ कोटी ७२ लाखाचा मुद्देमाल जप्तपर्यावरण आणि प्रसारमाध्यमे विषयावर शिवाजी विद्यापीठात शनिवारी कार्यशाळाअखिल भारतीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा पुरूष संघ जाहीरजिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारी रोजी मतदान, तर मतमोजणी...NMMS परीक्षेची अंतिम उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्धदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजली

जाहिरात

 

खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र विश्‍वराज यांच्या विवाहनिमित्त झाला शाही स्वागत सोहळा

schedule20 May 24 person by visibility 1346 categoryसामाजिक

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र आणि भिमा सहकारी साखर कारखान्याचेचेअरमन चिरंजीव विश्‍वराज आणि गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार सी. आर. पाटील यांची पुतणी मंजिरी यांचा नुकताच विवाह सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने रविवारी कोल्हापुरातील हायलँड क्लब येथे शाही स्वागत समारंभ पार पडला. अत्यंत दिमाखदार अशा या सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक, औद्योगिक, कला-क्रीडा, प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावून, वधुवरांना शुभाशिर्वाद दिले. 

त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, नामदार चंद्रकांतदादा पाटील, सुभाष देशमुख, लक्ष्मणराव ढोबळे, खासदार सुजय विखे-पाटील, धैर्यशिल माने, श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, हेमंत पाटील, आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे, प्रकाश आबिटकर, शिवेंद्रराजे भोसले, रणजितसिंह मोहिते- पाटील, प्रसाद लाड, धैर्यशिल मोहिते-पाटील, दै. पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, उद्योगपती संजय घोडावत, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, मालोजीराजे छत्रपती, माजी खासदार राजू शेट्टी, कुलगुरू डी.टी. शिर्के, काडसिध्देश्‍वर स्वामी यांच्यासह अनेक मान्यवरांनी नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, अरूंधती महाडिक, स्वरूप महाडिक, अमल महाडिक, शौमिका महाडिक, पृथ्वीराज महाडिक, वैष्णवी महाडिक, कृष्णराज महाडिक यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रमुख मान्यवरांचा विशेष स्वागतपर सत्कार करून, महाडिक परिवारातील सदस्यांनी उपस्थित पाहुण्यांचे आदरातिथ्य केले. 

अत्यंत शाही आणि दिमाखदार अशा या सोहळ्याला कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्हयासह संपूर्ण राज्यातून आणि देशातून विशेष मान्यवर आवर्जुन उपस्थित राहिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes