SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात एनर्जी स्वराज यात्रेचे स्वागतमोडी लिपी अभ्यासक्रमास प्रवेशासाठी 20 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढरब्बी हंगाम 2024 पीकस्पर्धा निकाल जाहीरकोल्हापुरात अतिक्रमणावर कारवाईसर्वेश पोतदार बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्ययेणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटर नूतन वास्तू उद्घाटनमहाराष्ट्र व पंजाब राज्यपालांच्या हस्ते आचार्य जवाहर लाल स्मृती मुद्रा व टपाल तिकिटाचे प्रकाशनमाजी मुख्यमंत्री दिवगंत वसंतराव नाईक यांचे कार्य राज्याला दिशादर्शक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसस्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हॉटेल असोसिएशनसोबत कार्यशाळाकोल्हापूर महापालिकेच्यावतीने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यां व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यातील 7 हजार अंगणवाडी सेविकांच्या खात्यात रु. 1 कोटी 49 लाख भाऊबीज जमा

schedule16 Oct 25 person by visibility 126 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यातील एकूण 7 हजार 495 अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बँक खात्यावर भाऊबीज रक्कम प्रति 2 हजार प्रमाणे रक्कम रु. 1 कोटी 49 लाख 90 हजार जमा करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बँक खती रक्कम वितरित करण्यात आली असल्याची  माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुजितकुमार इंगवले यांनी केले आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीस या बालविकासाच्या कार्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत असून त्यांचा सन्मान म्हणून शासनाच्यावतीने भाऊबीज भेट स्वरुपात आर्थिक लाभ देण्यात आला आहे. सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम थेट (Direct Benefit Transfer पद्धतीने) जमा करण्यात आली आहे.

या उपक्रमामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मनोबल वृद्धिंगत होऊन बालविकास योजनांच्या अंमलबजावणीस अधिक गती  मिळेल, अशी अपेक्षा महिला व बालविकास विभागाने व्यक्त केली आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes