SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सेवानिवृत्ती म्हणजे कार्याचा शेवट नव्हे, तर समाजासाठी नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात : कॉ. डॉ. भारत पाटणकरसंजय घोडावत फाउंडेशनकडून एचआयव्हीग्रस्तांना मदत१२ वी PCB नंतरच्या करिअर संधीबाबत रविवारी कदमवाडी येथे मार्गदर्शन सेमिनारकेशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाला वेग: रंगकर्मींच्या अटी मान्य, कोल्हापूर महापालिकेचा सकारात्मक निर्णय!कोल्हापूर महापालिकेच्या २,५०५ कर्मचाऱ्यांना गणवेश व साडीचे वाटप सुरूमहावीर गार्डन मॉर्निंग ग्रुपकडून महापालिकेच्या स्मशानभूमीस तीन लाकूड कटिंग यंत्रांची भेटआमदार अमल महाडीक यांच्याकडून स्वखर्चातून 1100 एलईडी दिवे; कोल्हापुराती बंद दिवे लवकरच उजळणार‘गोकुळ’वर शेतकऱ्यांचाच ताबा राहणार; कोल्हापूरच्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची' लढाई : सतेज पाटलांचा एल्गार! कोल्हापूर महानगरपालिका : घरफाळा 6 टक्के सवलत योजनेचा आज अखेरचा दिवस​"डिजिटल क्रांतीचे महाशक्तीपीठ: चला, सोशल मीडियाला बनवूया परिवर्तनाचे माध्यम!"

जाहिरात

 

संजय घोडावत फाउंडेशनकडून एचआयव्हीग्रस्तांना मदत

schedule30 Jun 26 person by visibility 96 categoryसामाजिक

कोल्हापूर : एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या उपचार, समुपदेशन, पोषण आणि पुनर्वसनासाठी गेली २५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या लोटस मेडिकल फाउंडेशनच्या पीपीपी-एआरटी (पब्लिक प्रायव्हेट - पार्टनरशिप  अँटीरेट्रोव्हायरल थेरपी) सेंटरला संजय घोडावत फाउंडेशनने आर्थिक सहाय्य देण्यात आले . हा कार्यक्रम सोमवार, दि. २९ जून रोजी लोटस मेडिकल फाउंडेशन येथे उद्योगपती संजय घोडावत यांच्या हस्ते  झाला.

यावेळी संजय घोडावत यांनी लोटस मेडिकल फाउंडेशनच्या उषा थोरात यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. एचआयव्हीग्रस्त रुग्णांना सन्मानाने आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी संस्था सातत्याने करत असलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेच्या इमारतीच्या सुशोभीकरणासाठी व रुग्णांसाठी दरमहा आर्थिक सहाय्य देणार असल्याची घोषणा केली.

लोटस मेडिकल फाउंडेशनच्या पीपीपी-एआरटी सेंटरमार्फत सध्या १,२०० हून अधिक एचआयव्ही बाधित रुग्णांना नियमित औषधोपचार, समुपदेशन, आवश्यक वैद्यकीय तपासण्या, पोषण मार्गदर्शन आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा दिली जाते. संजय घोडावत फाउंडेशनच्या आर्थिक सहाय्यामुळे या सेवा अधिक सक्षम व परिणामकारक होणार असून रुग्णांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत.

 कार्यक्रमात उद्योगसमूह आणि स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून उभ्या राहणाऱ्या सहकार्याचे महत्त्व संजय घोडावत यांनी अधोरेखित केले. एचआयव्हीग्रस्त व्यक्तींना भेदभावमुक्त, सन्मानपूर्वक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळण्यासाठी शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि उद्योगसमूह यांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे विश्वस्त व्ही. बी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. लोटस मेडिकल फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. किमया शहा यांनी संजय घोडावत फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी बोलताना ते म्हणाले की संजय घोडावत यांच्या सहकार्यामुळे पीपीपी-एआरटी सेंटरच्या सेवा अधिक बळकट होऊन गरजू रुग्णांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    
  यावेळी लोटस मेडिकल फाउंडेशनचे  रमाकांत भिंगार्डे, सुनील  गुंडाळे, मार्गदर्शक डॉ निरंजन शहा, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी साठे, सकाळ समूहाचे यतीश शहा, संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, समुपदेशक उपस्थित होते. तसेच संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रो.उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, प्रिन्सिपल डॉ. विराट गिरी व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes