प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये संत गाडगेबाबा जयंती उत्साहात
schedule25 Feb 26 person by visibility 160 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : येथील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका सविता पाटील, पर्यवेक्षिका अंजली आंबर्डेकर, शिक्षकवृंद व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी प्रमुख मनोगत विद्या मंडलिक यांनी व्यक्त करताना गाडगेबाबांच्या स्वच्छता, समाजप्रबोधन व सेवाभावी कार्याचा आदर्श विद्यार्थिनींनी अंगीकारावा, असे प्रतिपादन केले. तसेच आसावरी मांगले हिने आपल्या विचारांमधून गाडगेबाबांच्या जीवनकार्याचा आढावा घेत विद्यार्थिनींना स्वच्छता व सामाजिक बांधिलकीचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी भाषण व मनोगत सादर करून गाडगेबाबांच्या विचारांचा प्रसार केला. तसेच शाळेच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाचे वातावरण प्रेरणादायी व उत्साहपूर्ण होते.