SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर एलसीबीचा थरारक 'ट्रॅप'; रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी बनावटीचे पिस्तुल जप्त!अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी समिती गठित करणार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलराज्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम प्राधान्याने सुरू : शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरविद्यार्थ्यांसाठीच्या प्रमुख पाच ते सहा योजनांची माहिती देणारे फलक शाळांमध्ये लावले जावे : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबई येथे आगमनसंजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी स्पर्धांचे आयोजनभाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा ! कृष्णराज महाडिक यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारीसंजय घोडावत यांचा ‘द ज्वेल्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मानजिल्हा परिषद निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीची गट नोंदणी प्रक्रिया पूर्ण केंद्रीय उत्पादन शुल्क दिन: देशाच्या आर्थिक प्रगतीचा कणा

जाहिरात

 

राज्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम प्राधान्याने सुरू : शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

schedule24 Feb 26 person by visibility 67 categoryराज्य

मुंबई :  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दहावी व बारावी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्त आणण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. राज्यातील 17 हजार अनुदानित शाळात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. उर्वरित 4 हजार शाळात लवकरच सीसीटीव्ही बसविले जातील, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.

राज्यातील शाळेतील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे, अभ्यंकर, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुमारे 65 हजार शाळांपैकी जिल्हा नियोजन समितीच्या 5 टक्के निधीतून आतापर्यंत 18 हजार शाळांत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.  या निधीतून केवळ सीसीटीव्ही नव्हे तर कंपाउंड, वर्गखोल्यांची दुरुस्ती आदी कामेही केली जात असल्याचे राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, डोंगरी भागातील शाळांसाठी स्वतंत्र डोंगरी विकास निधी उपलब्ध असून त्या माध्यमातूनही या भागातील शाळेत सीसीटीव्ही बसविण्याची सूचना करण्यात येईल. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करून शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes