सर्वेश पोतदार बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्य
schedule17 Nov 25 person by visibility 110 categoryक्रीडा
कोल्हापूर : अनुज् चेस ॲकॅडमीच्यावतीने दि 16 नोव्हेंबर रोजी यशवंतराव घाटगे हायस्कूल, कागल येथे घेण्यात आलेल्या शालेय 16 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन अजित माने व प्राध्यापक विवेकानंद सूर्यवंशी पाटील यांचे हस्ते पटावरील चाल करून करण्यात आले.
स्पर्धेमध्ये 6 फेऱ्या घेण्यात आल्या. सर्वेश पोतदार याने 6 गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले. वेंकटेश खाडे पाटील याने 5.5 गुण मिळवून उपविजेतेपद पटकाविले.
▪️स्पर्धेतील इतर विजेते पुढील प्रमाणे
तृतीय क्रमांक प्रणव मोरे 5.5 गुण
चौथा क्रमांक अथर्व तावरे 5 गुण
पाचवा क्रमांक मानस महाडेश्वर 5 गुण
सहावा क्रमांक प्रेम निचळ 5 गुण
सातवा क्रमांक अच्युत दवणे 5 गुण
आठवा क्रमांक प्रथमेश व्यापारी 5 गुण
नववा क्रमांक अभिनंदन पाटील 5 गुण
उत्कृष्ट विद्यार्थिनी ऋतुजा हेंडगे 4 गुण
▪️16 वर्षाखालील इतर विजेते
8 वर्षाखालील
प्रथम क्रमांक जय पाटील 4 गुण
द्वितीय क्रमांक स्वरीत गवंडी 3 गुण
तृतीय क्रमांक शिवराज कामते 3 गुण
चौथा क्रमांक श्रीनय पालनकर 3 गुण
पाचवा क्रमांक शौर्य आवटे 2.5 गुण
उत्कृष्ट विद्यार्थिनी जिजा व्यापारी 2 गुण
10 वर्षाखालील
प्रथम क्रमांक सुबोध कुलकर्णी 4 गुण
द्वितीय क्रमांक ओम इंगळे 3.5 गुण
तृतीय क्रमांक वर्धनराजे निंबाळकर 3 गुण
चौथा क्रमांक सक्षम नाटेकर 3 गुण
पाचवा क्रमांक शिवराज फडतारे 2 गुण
सहावा क्रमांक शौर्य पाटील 2 गुण
12 वर्षाखालील
प्रथम क्रमांक सार्थक घुले 5 गुण
द्वितीय क्रमांक संस्कार पाटील 5 गुण
तृतीय क्रमांक आदर्श चौगुले 5 गुण
चौथा क्रमांक ध्रुव गोयल 4 गुण
पाचवा क्रमांक आयुष जाधव 4 गुण
उत्कृष्ट विद्यार्थिनी जान्हवी मेंगे 3.5 गुण
14 वर्षाखालील
प्रथम क्रमांक रुद्र माने 5 गुण
द्वितीय क्रमांक श्रेणिक देसाई 4 गुण
तृतीय क्रमांक यश हेंडगे 4 गुण
चौथा क्रमांक ओजस व्हनमाने 4 गुण
पाचवा क्रमांक आध्विक विचारे 4 गुण
सहावा क्रमांक ओम कागवाडे 4 गुण
उत्कृष्ट विद्यार्थिनी शमिता पाटील 3 गुण
अनुज् चेस अकॅडमी विजेते
प्रथम क्रमांक पृथ्वीराज गुरव 4 गुण
द्वितीय क्रमांक रत्नदीप हजारे 4 गुण
तृतीय क्रमांक समर्थ घुले 4 गुण
चौथा क्रमांक सोहम कुलकर्णी 4 गुण
पाचवा क्रमांक शौर्य कटके 4 गुण
सहावा क्रमांक आयुष कदम 3.5 गुण
सातवा क्रमांक आर्यन गुरव 3 गुण
उत्कृष्ट विद्यार्थिनी अफरीन फकीर 3 गुण
उत्तेजनार्थ बक्षीसे : शिवतेज कामटे, विवान क्षीरसागर; फजल मुजावर; स्वरा इंगळे
स्पर्धेमध्ये एकूण 114 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री बाबूराव पाटील यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण अर्चना मोरे, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव कृष्णात पाटील, उत्तम कामटे तसेच संभाजी पसारे आदी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विजय इंगळे, अनुराग पाटील यांनी परिश्रम घेतले.