SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ. महादेव नरके यांचे पुस्तक विद्यार्थी आणि संशोधकांसाठी दिशादर्शक : डॉ. संजय डी. पाटीलकोल्हापुरात २१ जून रोजी 'राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषद'बँकिंग प्रगतीत वसुली अधिकाऱ्यांचे योगदान मोलाचे: डॉ. सतीश घाळीपुण्यात गोकुळ दूध संघ संस्थाप्रतिनिधींकडून उपनिबंधक राजकुमार पाटील धारेवर पट्टणकडोली येथे "भंडारा" चित्रपटाचा भव्य टायटल लॉन्च सोहळा उत्साहात संपन्नगोरगरिबांचे रेशन बंद केल्यास रेशन दुकानदारांच्या दारात होणार नोटीसची होळी; करवीर शिवसेनेचा इशाराठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का? लोकसभेत ‘ऑपरेशन टायगर’ची खळबळ; फुटीच्या उंबरठ्यावर शिवसेना (UBT)!वाळवंटीकरण रोखूया, धरणीला हिरवेगार करूया: जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण दिनअतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिल

जाहिरात

 

कोल्हापुरात २१ जून रोजी 'राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषद'

schedule17 Jun 26 person by visibility 158 categoryसामाजिक

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक सलोख्याचा वारसा पुढे नेण्यासाठी 'राजर्षी शाहू सलोखा मंच, कोल्हापूर'च्या वतीने रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे 'राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषद' आयोजित करण्यात आली आहे.

या परिषदेत विविध राज्यांतील विचारवंत आणि अभ्यासक सहभागी होणार आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील छत्रपती शाहूजी संस्थानचे अध्यक्ष ॲड. नंद किशोर वर्मा, कुर्मी समाज प्रदेश उपाध्यक्ष कैलास पटेल, डॉ. डी. के. वर्मा, जे. एन. कटियार, इंजि. राजेश कुमार तसेच महाराष्ट्रातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, डॉ. माधुरी चौगुले आणि शिवाजी विद्यापीठाच्या माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ. पद्मा पाटील उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची व्याप्ती आणि त्यांच्या विचारांचा प्रसार देशपातळीवर करणे हे आहे. 'राजर्षी शाहू सलोखा मंच'चे निमंत्रक वसंतराव मुळीक, सह-निमंत्रक बबन रानगे आणि सचिव संजय कांबळे यांनी सर्व शाहू प्रेमींना या परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

या पत्रकार परिषदेस डी.जी. भ्रास्कर, सोमनाथ घोडेराव, शशिकांत पाटील, सुखदेव बुध्ध्याळकर, कादर मलबारी, संभाजी पाटील, बाळासाहेब भोसले, शिवमूर्ती झगडे, आकाश शेलार, महेश मछले, आनंद म्हाळुंगकर, अनिल गिरी आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes