तात्यासाहेब कोरे आय.टी.आय.च्या विद्यार्थ्यांची पाटील ऑटोमेशन पुणे कंपनीमध्ये निवड
schedule15 May 24 person by visibility 321 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : तात्यासाहेब कोरे औद्योगिक प्रशिक्षण संस्था वारणानगर.या संस्थेतील फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेक. व वेल्डर या विभागातील २५ विद्यार्थ्यांची पाटील ऑटोमेशन प्रा.लि. पुणे या नामांकित कंपनीत कँम्पस इंटरव्ह्यू द्वारे निवड झाली. कंपनीने संस्थेमध्ये गटचर्चा’ इंटरव्ह्यू आयोजित करत चार विभागांमधून विद्यार्थ्यांची निवड केली.
विद्यार्थ्यांना पाटील ऑटोमेशन प्रा.लि. पुणे या नामांकित कंपनीत नोकरीची(शिकाऊ उमेदवारी) संधी मिळाली अशी माहिती संस्थेचे प्राचार्य बी.आय.कुंभार यांनी दिली. या कंपनीमध्ये अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि वाहन क्षेत्रातील संबधीत विविध रोबोटिक्स मशीन तयार केली जातात.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व आपल्या ज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी करावा असा मौलिक सल्ला केला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी, प्राचार्य बी.आय.कुंभार, गटनिदेशक आर.आर.कापरे, इंजीनियरिंग चे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर श्री पी.जे. पाटील आय.टी.आयचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर पी.पी.पाटील, एस.एस.पाटील,बी.टी.वायदंडे,एस.आर.बुद्दे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व विभागाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट समन्वयकांचे व सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
निवड झालेल्या विद्यार्थ्याची नावे अशी: फिटर: विराज माइंगडे,विवेक जाधव, प्रतिक पाटील,प्रतिक जाधव,सागर पाटील,अविनाश साळुंखे,प्रतीक पाटील,सुधर्म डुबल,शुभम माजाळकर,कुणाल जाधव,विनायक पाटील,अविनाश पाटील वेल्डर: अमर थोरात,डॉन शिकलगार. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: अविष्कार पाटील,दिग्विजय बिराजदार,रेहान शिकलगार,स्नेहदीप शेलार इलेक्ट्रिशियन: तनिष्क घाटगे,प्रतिक सुतार,पृथ्वीराज पाटील,विवेक पाटोळे,विवेक खुडे,प्रतिक जाधव,पवन घाटगे.