SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात संत रविदास महाराज जयंतीजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : भुदरगड भरारी पथकाची धडक कारवाई; 14 लाखांचा मुद्देमाल जप्त; उमेदवारावर आचारसंहिता भंग गुन्हा दाखलरांगोळी येथील संवेदनशील खुनाचा गुन्हा उघड, तीन आरोपी अटक.समूहभावाचे खेड्याचे जीवनतत्व भंगल्यानेच सामाजिक प्रश्र्न वाढले : ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर महानगरपालिका : महापौर पद व इतर सर्व पद विभागणीबाबत निर्णय उद्या; महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठकलढणार्‍यांना पाठबळ द्या : रमेश गावस; विद्यापीठात पर्यावरण आणि प्रसारमाध्यमे विषयावर कार्यशाळानिवडणूक काळात कोणत्याही प्रकारची अनियमितता नको : जिल्हाधिकारी अमोल येडगेमाहिती विभागाचे छायाचित्रकार यमकरांचा निवृत्ती निमित्त सत्कार

जाहिरात

 

रांगोळी येथील संवेदनशील खुनाचा गुन्हा उघड, तीन आरोपी अटक.

schedule01 Feb 26 person by visibility 127 categoryगुन्हे

कोल्हापूर : रांगोळी येथील संवेदनशील खुनाचा गुन्हा उघडकीस आला. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.

दिनांक 29 जानेवारी रोजी रात्रौ 9.30 ते 10.00 च्या दरम्यान  काळम्मावाडी वसाहत, स्मशानभुमीजवळ रांगोळी, ता. हातकणंगले येथे  शुभम कुमार सादळे, व.व. 27. रा. रांगोळी, ता. हातकणंगले याच्यावर आरोपी दर्शन कांबळे, सागर माने व त्यांचा एक साथीदाराने मिळून आरोपी दर्शन कांबळे याच्या बहिणीस पळवून नेण्यामध्ये शुभम सादळे याने मदत केल्याचा राग मनात धरुन शिवीगाळ करुन  हत्यारानी शुभम सादळे याचे पोटात वार करून त्याचा निघृन खून केला होता. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 तपास पथकास  गुन्ह्यातील  आरोपी हे अतिग्रे फाटा, ता. हातकणंगले येथे येणार आहेत अशी माहिती मिळाली.  तपास पथकाने अतिग्रे फाटा हातकणंगले येथे दि. 31 जानेवारी रोजी सापळा लावून संशयित आरोपी  1) दर्शन महेश कांबळे वय 22, रा. एमएसईबी जवळ, माळभाग, रांगोळी, ता. हातकणंगले,  2) सागर सुनिल माने वय 33, रा. आंबेडकर नगर, माळभाग, रांगोळी, ता. हातकणंगले,  व 3) प्रथमेश उर्फ पेप्या रविंद्र कांबळे वय 23, रा. आण्णा भाऊ साठे समाज भवन जवळ, रांगोळी, ता. हातकणंगले,  यांना ताब्यात घेतले. नमुद आरोपींना ताब्यात घेतलेनंतर त्यांचेकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यंनी नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गुन्हयाचे अधिक तपासकामी शिवाजीनगर पोलीस ठाणेचे ताब्यात दिले आहेत. यातील आरोपी सागर सुनिल माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक,  योगेश कुामर गुप्ता ,  अपर पोलीस अधीक्षक,  आण्णासाहेब जाधव  व उपविभागीय पोलीस अधिकारी  विक्रांत गायकवाड सो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक  संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार सागर चौगुले, विशाल चौगुले, राजू कोरे, गजानन गुरव, नवनाथ कदम, प्रदिप पाटील, अनिल जाधव, सुशिल पाटील, राजेंद्र वरंडेकर, रोहीत मर्दाने, निवृत्ती माळी, संदीप बेंद्रे, विजय इंगळे व योगेश गोसावी यांनी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes