कोल्हापूर : कोरीया चांगवान येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय विश्वचषक शुटींग स्पर्धेमधे केआयटी महाविद्यालय कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमबाज शाहू माने याने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना त्याच्या संघातील मेहुली घोष हिच्या साथीने १० मीटर एअर रायफल मिश्र या प्रकारामधे सुवर्ण पदक पटकावले.
पात्रता फेरीमधे शाहू व मेहुली यांनी सहभागी ३० संघातील स्पर्धकांमधे सर्वाधिक ६३४: ३ गुण पटकावत प्रथम तर हंगेरीयन संघाने ६३०: ३गुण घेऊन पात्रता फेरीमधे द्वितीय स्थान पटकावत थेट सुवर्ण पदकासाठी अंतिम फेरीमधे प्रवेश मिळविला. अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धक हंगेरी संघामधील ॲालंम्पियन ईस्तवान पेनी व ईस्तर मेसझारोस हे दोघेहि भारतीय खेळाडूंपेक्षा अनुभवी असलेने त्याचेकडून चांगली सुरवात झाली. मात्र शाहू व मेहुली यांनी जोरदार प्रतिकार करुन १७ विरूध्द १३ अशी मात करीत सुवर्ण पदक जिंकले.
शाहू या स्पर्धेमधे सांघिक प्रकारामधूनही भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे अर्जुन बबूता (पंजाब) व पार्थ माखिजा (दिल्ली) यांच्यासह भारतीय संघ पात्रता फेरीत द्वितीय स्थान पटकावून थेट सुवर्ण पदक लढतीसाठी पात्र झाला आहे गुरूवारी पहाटे त्यांची यजमान कोरीया संघाबरोबर सुवर्ण पदकासाठी लढत होणारं आहे.
भारतीय संघाच्या अर्जुन पुरस्कार विजेत्या प्रशिक्षिका सुमा शिरुर यांनी शाहूने गुरु पौर्णिमा दिवशी सुवर्ण पदक मिळविलेने समाधान व्यक्त केले आहे. शाहू हा केआयटी कॉलेजमध्ये मेकॅनिकल विभागात दुसऱ्या वर्षांमध्ये शिकत आहे . त्याला संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली सचिव दीपक चौगुले, कार्यकारी संचालक डॉ. व्ही व्ही कार्जीन्नि प्रभारी संचालक डॉ.एम एम मुजुमदार, सल्लागार मोहन वनरोट्टी, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. उदय भापकर, क्रीडा विभाग प्रमुख विजय रोकडे यांचे अनमोल सहकार्य लाभले.