SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बालदिनानिमित्त १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहहरभरा उत्पादनात कोल्हापूरच्या शिवाजी पाटील यांचा राज्यात प्रथम क्रमांकनिलेश पाटील संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण; अपघात नव्हे घातपाताचा ग्रामस्थांचा आरोपगांधी मैदानाचा वापर केवळ खेळासाठीच...! महिनाभरात मैदान खेळाडूंसाठी सुसज्ज करा : आमदार राजेश क्षीरसागरमानवतेचा संदेश देणारा जागतिक दयाळूपणा दिनसेवा संकल्प इनोव्हेशन चॅलेंज अंतर्गत जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धा उत्साहातमनपाडळे ल.पा. तलावातून शेतीसाठी पाणी उपशास बंदीकरवीर व कागल तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; आमदार सतेज पाटील यांची मागणीराऊत हे राज्याचे मुक्त विद्यापीठ, त्यांनी आमच्या पक्षात नाक खुपसू नये; मंत्री मुश्रीफांचा घणाघातकागल व गडहिंग्लज तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी प्रयत्नशील : मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण

जाहिरात

 

हरभरा उत्पादनात कोल्हापूरच्या शिवाजी पाटील यांचा राज्यात प्रथम क्रमांक

schedule13 Nov 26 person by visibility 121 categoryराज्य

◼️रब्बी हंगाम २०२५ पीक स्पर्धेचा निकाल जाहीर; जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी

कोल्हापूर : शेतकऱ्यांमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, पीक उत्पादनात वाढ घडवून आणणे आणि नावीन्यपूर्ण शेती प्रयोगांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित रब्बी हंगाम २०२५ पीक स्पर्धेचा राज्य व जिल्हास्तरीय निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, हरभरा पिकात हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथील शिवाजी विष्णू पाटील यांनी हेक्टरी ६८.३५ क्विंटल उत्पादन घेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण १२४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये केलेल्या प्रयोगांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या अनुभवांचा इतर शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे आणि राज्याच्या कृषी उत्पादनात भर घालणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

▪️जिल्हास्तरीय विजेते पुढीलप्रमाणे :

रब्बी ज्वारी

- प्रथम : तानाजी जोती हिंदुळे, दक्षिण वडगाव, ता. करवीर – ६०.५० क्विंटल.
- द्वितीय : पांडुरंग दिनकर पाटील, कळंबे तर्फ ठाणे, ता. करवीर – ५३.२० क्विंटल.
- तृतीय : संजय श्रीकांत पुजारी, हातकणंगले – ५१.२८ क्विंटल.

हरभरा

- प्रथम : कलगोंडा बाबुराव अंकलखोपे, अर्जुनवाड, ता. शिरोळ – ५६.७५ क्विंटल.
- द्वितीय : कुमार बाबुराव अंकलखोपे, अर्जुनवाड, ता. शिरोळ – ४९.५९ क्विंटल.
- तृतीय : जगदीश बसगोंडा पाटील, चंदूर, ता. हातकणंगले – ४६.६२ क्विंटल.

गहू

- प्रथम : इंदुमती शिवाजी पाटील, भादोले, ता. हातकणंगले – ५८.१० क्विंटल.
- द्वितीय : सचिन जयसिंगराव पाटील, भादोले, ता. हातकणंगले – ५७.०४ क्विंटल.
- तृतीय : संभाजी पांडुरंग भंडारी, नरंदे, ता. हातकणंगले – ५२.२९ क्विंटल.

करडई

- प्रथम : रुक्मिणी यशवंत पाटील, अर्जुनवाड, ता. शिरोळ – ९.७९ क्विंटल.

पीक स्पर्धेतील विजेत्यांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. तालुकास्तरावर अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये; जिल्हास्तरावर १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये, तर राज्यस्तरावर ५० हजार, ४० हजार व ३० हजार रुपये अशी पारितोषिकांची तरतूद आहे.

शेतकऱ्यांनी उत्पादनातील सातत्य राखून आपल्या शेतीतील प्रयोग व अनुभव परिसरातील इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावेत. तसेच रब्बी हंगाम २०२६ मधील पीक स्पर्धेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

पीक स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes