SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भारतीय लोकशाहीचा पोलादी आराखडा: राष्ट्रीय नागरी सेवा दिनकोल्हापूर जिल्ह्यातील २९ हजार कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार; शासकीय जमिनीवरील २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल होणारराधानगरी तालुक्यातील अवसायनात संस्थांच्या सुनावणीस गती द्या : अभिजीत तायशेटे, संचालक, गोकुळ दूध संघ कोल्हापूर येथील नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी देऊ : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेकोल्हापूर भूमी अभिलेख झाले ‘हायटेक’; ३ कोटी ६९ लाखांच्या आधुनिक यंत्रसामग्रीचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरणदीड वर्षांपासून रखडले काम; उचगाव-गडमुडशिंगी रस्त्यासाठी शिवसेना मैदानात!महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर; सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव आदी जिल्ह्याचा समावेश भारतीय हवाई दलाचे ‘फ्लाईट सिम्युलेटर’ बनले विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू; केआयटी मध्ये भारतीय वायुदलाचा विशेष जनजागृती कार्यक्रमजागतिक कला व वारसा दिनानिमित्त विद्यापीठात ‘रंग कुंचल्याचे’ स्पर्धामहात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या अनुबंधाविषयी शिवाजी विद्यापीठात गुरूवारी चर्चासत्र

जाहिरात

 

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी 50 हजारचे सीड फंडिंग; शिवाजी विद्यापीठ आंतरराष्ट्रीय परिषदेत द्वितीय क्रमांक

schedule17 Apr 26 person by visibility 209 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागातील विद्यार्थ्यांच्या ‘सोनिक शील्ड’ नावीन्यपूर्ण स्टार्टअप कल्पनेला  शिवाजी विद्यापीठात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत  द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले. या स्टार्टअपसाठी 50 हजार रुपयांचे सीड फंडिंग प्राप्त झाले आहे. 

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे इंटरनॅशनल अकॅडेमिया–इंडस्ट्री–गव्हर्नमेंट कॉन्क्लेव्ह (आयएआयजीसी २.०) चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी नाविन्यपूर्ण स्टार्टअप कल्पना मांडल्या.  यामध्ये या परिषदेत ‘शार्क टॅंक कम हॅकॅथॉन’ स्पर्धेअंतर्गत आयटी आणि उदयोन्मुख गटात डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या एआय-एमएल विभागच्या  द्वितीय वर्षातील विद्यार्थी प्रणव प्रदीप यादव ,  योगेश वैजनाथ अंकम आणि जैद मज्जीद शेख यांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.

ही स्पर्धा विज्ञान, अभियांत्रिकी, आरोग्य व शेती क्षेत्रातील नवकल्पना, स्टार्टअप्स आणि ट्रेंड्स यांवर आधारित असून “विकसित भारत २०४७” या संकल्पनेशी निगडित होती. स्टार्टअप संकल्पनेतील नावीन्य, सर्जनशीलता आणि उद्योजकीय दृष्टिकोनामुळे त्यांची निवड करण्यात आली. या सीड फंडिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या स्टार्टअप कल्पनेला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक  डॉ. ए. के. गुप्ता,  प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील आणि प्राध्यापक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes