SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा बंजारा रंगात रंगलेला होळी उत्सव !सर्वसामान्यांच्या जीवनात विकासरूपी सप्तरंगांची उधळण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह साजरी केली धुळवडसाळोखेनगर डी. वाय.पी.मध्ये रक्तदान शिबिरास प्रतिसाद; शंभरच्या वर रक्त बाटल्यांचे संकलनमहिला उद्योजकांनी उपलब्ध संधींचा लाभ तत्परतेने घ्यावा: वैष्णवी अंदूरकरविद्यापीठ कॅम्पसमधून आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडावेत: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के; शिवस्पंदन क्रीडा महोत्सवात तंत्रज्ञान अधिविभागास सर्वसाधारण विजेतेपदशिवाजी विद्यापीठातील 'संगीत' तलाव आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकेच्या मुखपृष्ठावरकोल्हापूर : घिसाड गल्ली परिसरात घराला भीषण आग; भाडेकरूंचे प्रापंचिक साहित्य आगीमध्ये खाक; फटाके गोडाऊन भस्मसात; सुमारे साठ लाखांचे नुकसानमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट; 'या' विषयावर सकारात्मक चर्चाआयआयसीटी फिल्‍म सिटीत जागा देणार, केंद्र सरकारकडून ४०० कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहितीस्वयंपूर्ण होण्यासाठी पुनर्वसन केंद्रातून मुला-मुलींना चांगल्या सेवा आणि शिक्षण द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठातील 'संगीत' तलाव आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकेच्या मुखपृष्ठावर

schedule14 Mar 25 person by visibility 103 categoryशैक्षणिक

▪️झाडाच्या प्रतिबिंबात रासायनिक संयुगाच्या संरचनेचा आभास ; डॉ. सुशीलकुमार जाधव यांच्या निरीक्षणाचे फलित

कोल्हापूर : ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ अशी एक सुप्रसिद्ध म्हण आहे. म्हणजे जे सूर्यालाही दिसत नाही, ते कवीच्या नजरेला दिसते. ही बाब संशोधकांनाही लागू आहे. सतत आपल्या संशोधनाच्या विचारात गुंतलेल्या संशोधकांनाही ‘जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी’ अशी सर्वत्रच आपल्या संशोधनाची प्रतिबिंबे दिसू लागतात. शिवाजी विद्यापीठातील शिक्षक, संशोधक डॉ. सुशीलकुमार जाधव यांच्या बाबतीतही असेच घडले. एरव्ही विद्यार्थ्यांमध्ये सनसेट पॉईंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाशेजारील तलावामधील झाडाच्या प्रतिबिंबामध्ये त्यांना एका रासायनिक संयुगाच्या संरचनेचा आभास झाला. ते छायाचित्र त्याच ठिकाणाहून त्यांनी टिपले आणि नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या स्प्रिंजर नेचर प्रकाशनाच्या ‘मॅक्रोमॉलेक्युलर रिसर्च’ (मार्च २०२५) या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेच्या मुखपृष्ठावर झळकण्याचा मान या छायाचित्राला लाभला.

या संदर्भात शिवाजी विद्यापीठातील नॅनो सायन्स व तंत्रज्ञान अधिविभागातील प्राध्यापक डॉ. सुशीलकुमार जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शंभूराज कापसे आणि प्रणोती पाटील हे विद्यार्थी संशोधन करीत आहेत. त्यांच्याच शोधनिबंधाच्या विषयास अनुसरून हे मुखपृष्ठ तयार केलेले आहे. छायाचित्रातील झाडाच्या फांद्या आणि त्यांचे पाण्यातील प्रतिबिंब हे ब्रँच्ड-पॉलिथिलिनमाईन या बहुलकाप्रमाणे (पॉलिमरसारखे) दिसते. हा पॉलिमर पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येतो. या पॉलिमरद्वारे पाण्यातील सेंद्रिय तसेच असेंद्रिय विषारी घटक वेगळे केले जाऊ शकतात.

 ‘मॅक्रोमॉलेक्युलर रिसर्च’ या आंतरराष्ट्रीय मानांकित जर्नलच्या प्रत्येक अंकामध्ये साधारण पंधरा ते वीस शोधनिबंध प्रसिद्ध होतात. या सर्वांमध्ये स्पर्धा घेऊन एका शोधनिबंधाशी संबंधित छायाचित्र मुखपृष्ठासाठी निवडले जाते. त्यामधून शिवाजी विद्यापीठ परिसरातील संगीत तलावाचे डॉ. जाधव यांनी काढलेल्या छायाचित्राची निवड या महिन्याच्या मुखपृष्ठासाठी करण्यात आली. या छायाचित्राचा वापर शोधनिबंधातील वैज्ञानिक माहिती कलात्मक पद्धतीने दर्शवण्यासाठी करण्यात आला आहे.

शिवाजी विद्यापीठाचा परिसर हा हिरवाईने, जैवविविधतेने नटलेला आहे. विद्यापीठातील ही नैसर्गिक स्थळे संशोधकांसाठी सुद्धा आता प्रेरणास्थळे ठरत आहेत, ही महत्त्वाची बाब आहे. विद्यापीठाच्या या नैसर्गिक विविधतेला आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेच्या मुखपृष्ठावर झळकवल्याबद्दल डॉ. जाधव आणि संशोधक विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes