राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा बंजारा रंगात रंगलेला होळी उत्सव !
schedule14 Mar 25 person by visibility 129 categoryराज्य

मुंबई : जिंतुर तालुक्यातील आडगाव तांड्यावर बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली. महिलांनी पारंपरिक वेषभूषेत मोहक नृत्य सादर करत होळीच्या रंगात रंग भरले.
या अनोख्या उत्सवात राज्याच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनीही सहभाग घेतला. बंजारा समाजाच्या भगिनींच्या आग्रहास्तव त्यांनी पारंपरिक वेष परिधान करून नृत्याचा आनंद घेतला.
पारंपरिक लेंगी गीते, नृत्य आणि रंगोत्सवाच्या जल्लोषात होळी साजरी झाली. यावेळी राज्यमंत्र्यांनी समाजातील सकारात्मक बदल आणि एकजुटीने कार्य करण्याचा संदेश दिला. नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत हा सांस्कृतिक सोहळा अधिक रंगतदार केला.
