SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भिमा कृषी प्रदर्शनात भागीरथी महिला संस्थेच्यावतीने मोफत झुणका-भाकरी वाटपमहाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा सोमवारी सत्कारदक्षिण-पश्चिम विभागीय युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठ संघाचे घवघवीत यशभाजपच्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांचा उद्या रविवारी सत्कारशाश्वत विकासासाठी संशोधन ही रसायनशास्त्राची सामाजिक, नैतिक जबाबदारी: डॉ. इंद्रजीत घोष; शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र परिषदडी. वाय. पाटील कृषी विद्यापीठात लवकरच ‘एमबीए ग्लोबल’ अभ्यासक्रमकोरे अभियांत्रिकीचे प्रा. अनिकेत तोडकर यांना पी.एच.डी. पदवी प्रदानशिवजयंती दिनी 'मेरा युवा भारत' मेगा पदयात्रेचे आयोजनव्हिनस कॉर्नर मार्केट व छ.शिवाजी मार्केट मधील थकबाकी असलेले पाच दुकानगाळे इस्टेट विभागामार्फत सीलकेंद्र सरकारच्या विविध योजनांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादनावर भर द्यावा भीमा कृषी प्रदर्शनात खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन

जाहिरात

 

दक्षिण-पश्चिम विभागीय युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठ संघाचे घवघवीत यश

schedule14 Feb 26 person by visibility 106 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : भारतीय विश्वविद्यालय संघ, नवी दिल्ली मार्फत आयोजित दक्षिण-पश्चिम विभागीय युवा महोत्सव २०२५-२०२६ जेएसएस अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अॅंड रिसर्च, श्री शिवरात्रीश्वरा नगर, म्हैसूर (कर्नाटक) येथे दि. ०९ ते १४ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत आयोजित करणेत आलेला होता. या युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठाचा एकूण ६० सदस्यांचा संघ सहभागी होवून संघाने खालील स्पर्धेत क्रमांक प्राप्त केले आहेत. 

पाश्चिमात्य समुहगीत - प्रथम क्रमांक
शास्त्रीय ताल वाद्य - प्रथम क्रमांक
हिंदी वक्तृत्व - प्रथम क्रमांक
मातीकाम - प्रथम क्रमांक
सुगम गायन - द्वितीय क्रमांक
कातरकाम - द्वितीय क्रमांक
व्यंगचित्र - द्वितीय क्रमांक
रांगोळी - द्वितीय क्रमांक
प्रश्नमंजूषा - तृतीय क्रमांक
पाश्चिमात्य एकल गायन - तृतीय क्रमांक
शास्त्रीय गायन - चतुर्थ क्रमांक
भारतीय समुहगीत - चतुर्थ क्रमांक
लोकसंगीत वाद्यवृंद - चतुर्थ क्रमांक
पश्चिमात्य एकल वाद्यवादन - चतुर्थ क्रमांक
लोकनृत्य - चतुर्थ क्रमांक
Creative Choreography - चतुर्थ क्रमांक
शास्त्रीय नृत्य - चतुर्थ क्रमांक
लघुनाटिका - चतुर्थ क्रमांक
मुकनाटय - चतुर्थ क्रमांक
स्थळ चित्र - चतुर्थ क्रमांक
हिंदी वादविवद - पाचवा क्रमांक
नकला - पाचवा क्रमांक

तसेच कला विभाग सर्वसाधारण विजेते पद व सर्वसाधारण दुसरा उपविजेते पद विद्यापीठास प्राप्त झाले. 

दक्षिण-पश्चिम विभागीय युवा महोत्सव विद्यापीठ संघास  प्रभारी कुलगुरु प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा. डॉ. श्रीमती. ज्योती जाधव,   कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यापीठ संघासोबत डॉ. रघुनाथ ढमकले, व्यवस्थापन परीषद सदस्य, डॉ. टी. एम. चौगले संचालक, विद्यार्थी विकास हे उपस्थित होते. तसेच शिवाजी विद्यापीठ संघासाठी संघव्यवस्थापक म्हणून    डॉ. ए. एस. बल्लाळ, आजरा महाविद्यालय, आजरा व प्रा. डॉ. शिला मोहिते, मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय, कडेगाव. जि. सांगली यांनी काम पाहिले. तसेच विद्यार्थी विकास विभागाचे विद्यापीठ संघाला सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes