SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठात लवकरच ‘एमबीए ग्लोबल’ अभ्यासक्रमकोरे अभियांत्रिकीचे प्रा. अनिकेत तोडकर यांना पी.एच.डी. पदवी प्रदानशिवजयंती दिनी 'मेरा युवा भारत' मेगा पदयात्रेचे आयोजनव्हिनस कॉर्नर मार्केट व छ.शिवाजी मार्केट मधील थकबाकी असलेले पाच दुकानगाळे इस्टेट विभागामार्फत सीलकेंद्र सरकारच्या विविध योजनांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादनावर भर द्यावा भीमा कृषी प्रदर्शनात खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांची कोल्हापूर महापालिकेला अभ्यास भेटमहात्मा बसवेश्वर पुरस्कारासाठी 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनएम .एड व बी .एड –एम .एड (एकात्मिक ) साठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२६बी.एस्सी.बी .एड् ((ITEP) साठी नॅशनल कॉमन एट्रन्स टेस्ट (NCTE) अर्ज भरण्याची अंतिम तारीख १० मार्च २०२६डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

जाहिरात

 

व्हिनस कॉर्नर मार्केट व छ.शिवाजी मार्केट मधील थकबाकी असलेले पाच दुकानगाळे इस्टेट विभागामार्फत सील

schedule13 Feb 26 person by visibility 118 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : महानगरपालिका मालकीचे भाडे तत्वावर देण्यात आलेले व्हिनस कॉर्नर मार्केट व छ.शिवाजी मार्केट मधील थकबाकी असलेले 5 दुकानगाळे आज इस्टेट विभागामार्फत सील  करण्यात आले.

 कोल्हापूर महानगरपालिकेच्या इस्टेट विभागामार्फत वसुली मोहिम राबवण्यात येत आहे. यामध्ये मागील थकबाकी व सन 2025-26 चे महापालिकेचे दुकान भाडे भरणे बाबत वेळोवेळी इस्टेट विभागामार्फत भाडेकरुंना सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज सदरची कारवाई व्हिनस कॉर्नर मार्केट व छ.शिवाजी मार्केट येथे राबविण्यात आली. यावेळी थकीत असलेले 5 दुकानगाळे सील करण्यात आले. 

यापुढे ही थकबाकीदारांवर दुकानगाळे सील होणेची तसेच मिळकतीवर बोजा नोंद करणेची कार्यवाही ठेवली जाणार असून महापालिका मालकीचे दुकान गाळेतील भाडेकरुंनी आपली थकबाकी मुदतीत भरण्यात यावी असे इस्टेट विभागाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. 

आजची कारवाई अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप-आयुक्त किरण धनवाडे,  सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, इस्टेट ऑफिसर विलास साळोंखे, लिपीक अरुण भोसले, रविंद्र काळे, जर्नादन भालकर, गिरीष नलवडे, कल्पना शिरदवाडे, सदानंद फाळके, सौरभ आवटे यांनी केली.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes