धक्कादायक..! : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार
schedule26 Feb 25 person by visibility 414 categoryगुन्हे

पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास आरोपीने तरुणीची दिशाभूल करत तिला मोकळ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बसण्यास भाग पाडले आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपीचे नाव दत्तात्रय गाडे असल्याची ओळख पटविण्यात आली असून पोलिसांची आठ पथके त्याच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. दरम्यान या घटनेनंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने स्वारगेट डेपोमध्ये तोडफोड केली आहे.
दरम्यान या घटनेचे पडसाद दिसून आले उद्धव ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी डेपो मध्ये तोडफोड करण्यात आले यावेळी आगार प्रमुखांचं निलंबन केलं पाहिजे आणि सुरक्षा रक्षकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वसंत मोरे यांनी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की स्वारगेट बस स्थानक परिसरात अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत होते ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शवणारी आहे. या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेला गांभीर्याने घेतले आहे. तसेच पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलत आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.